घरमनोरंजनअनुष्का शर्मा प्रेग्नेंट? व्हायरल फोटोमुळे होतेय चर्चा

अनुष्का शर्मा प्रेग्नेंट? व्हायरल फोटोमुळे होतेय चर्चा

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली अनेकदा त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतात. मागील काही दिवसांपासून हे दोघेही पुन्हा एकदा आई-वडील होणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत या दोघांनी कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. पण नुकताच अनुष्का आणि विराटचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात या दोघांना अयोध्या राममंदिरच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. या फोटोमध्ये अनुष्का खरंच प्रेग्नेंट असल्याचं दिसत आहे.

अनुष्का शर्मा प्रेग्नेंट?

Virat Kohli Anushka Sharma, Pran Pratishtha: कोहली और अनुष्का को भी मिल गया  प्राण प्रतिष्ठा का न्योता... अब रामलला के दर्शन का इंतजार - Virat Kohli and Anushka  Sharma invited to Lord

- Advertisement -

अयोध्या राममंदिरच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशातील अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या यादीत भारतीय क्रिकेटर विराह कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे नाव देखील जोडले गेले आहे. याचं आमंत्रणादरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात अनुष्का प्रेग्नेंट असल्याचं दिसत आहे. पण या फोटोत ती तिचे बेबी बंप लपवताना दिसतेय. परंतु अद्याप याबाबात कोणतीही अधिकृत माहिती अनुष्का-विराटने शेअर केलेली नाही.

2021 मध्ये दिला होता मुलीला जन्म

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे आधीच एका मुलीचे पालक आहेत. अनुष्काने जानेवारी 2021 मध्ये त्यांची मुलगी वामिकाला जन्म दिला होता. त्यावेळी देखील अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांच्या इंस्टाग्राम फोटोंद्वारे याची घोषणा केली होती.

- Advertisement -

 


हेही वाचा : इरा खानचा सिगारेट ओढतानाचा फोटो व्हायरल; सोशल मीडियावर होतेय ट्रोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -