घरमनोरंजनAryan Khan Bail : शाहरुख खानने आर्यनच्या चिंतेत जेवण सोडले अन् फक्त...

Aryan Khan Bail : शाहरुख खानने आर्यनच्या चिंतेत जेवण सोडले अन् फक्त कॉफी पितोय, वजनातही घट

Subscribe

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी २८ तुरुंगवासानंतर शाहरुखनचा लेक आर्यन खानला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. आर्यन खानला तुरुंगातून बाहेर येत इतक्या दिवसानंतर त्याच्या घरी मन्नतला जायला मिळेल. मात्र आर्यनला जामीन मंजूर होताच मन्नतबाहेर जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक चाहत्यांनी शाहरुखच्या मन्नत या बंगल्याबाहेर फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला. तर दुसरीकडे शाहरुखने आर्यनच्या वकिलांसोबत फोटो काढून सर्वांचे आभार मानले.

या फोटोमध्ये शाहरुख बऱ्याच दिवसांनी हसताना दिसला. मात्र या फोटोंमध्ये शाहरुख थोडा अशक्त दिसत असल्याचे अनेक चाहत्यांना वाटतेय. दरम्यान आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनीही एका मुलाखतीत सांगितले की, हा काळ शाहरुख आणि गौरीसाठी फार कठीण गेला आहे. शाहरुखने आपली सर्व व्यावसायिक कामे सोडून आर्यनला बाहेर काढण्यासाठी आपले संपूर्ण प्राण समर्पित केले.

- Advertisement -

मुकुल रहातोगी पुढे म्हणाले की, ‘शाहरुखने बरेच दिवस चांगल्याप्रकारे जेवला नाही. फक्त कॉफीवर कॉफी पित होता’. या घटनेचा शाहरुखच्या तब्येतीवर मोठा परिणाम झाला हे नाकारता येणार नाही. आर्यनच्या जामीनासाठी शाहरुख दक्षिण मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये थांबला होता, तिथे मुकुल रहातोगीही होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख आणि गौरी स्वतः तुरुंगात जाऊन आर्यनला घरी आणणार आहेत. याशिवाय पूजा ददलानी आणि शाहरुखचे बॉडीगार्डही आर्यनला घरी आणण्यासाठी आज आर्थर रोड जेलबाहेर जाऊ शकतात असे म्हटले जातेय. मात्र या घटनेचा केवळ शाहरुखच नाही तर गौरी खानच्या तब्येतीवरही वाईट परिणाम झाल्याचे सांगण्यात येतेय. सत्र न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज वारंवार फेटाळल्याने गौरी खूप अस्वस्थ होती. फोनवर मैत्रिणींशी बोलत असताना गौरी अनेकदा रडत असल्याचं अनेकांनी सांगितलं.

- Advertisement -

तर दुसरीकडे, आर्यन खानच्या जामीनानंतर त्याची बहीण सुहाना खान हीने एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुहाना खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटोंचा कोलाज शेअर केला आहे, जो तिच्या बालपणीच्या फोटोंनी तयार केलेला आहे. ज्यात शाहरुख सुहाना आणि आर्यनला घेऊन खेळत मस्ती-मस्ती करताना दिसतोय. यादरम्यान सुहाना आणि आर्यन कॅमेऱ्यासमोर फनी विचित्र एक्सप्रेशन देत आहेत. त्याचबरोबर शाहरुख खानही आपल्या मुलांसोबत खूप खुश दिसतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

सुहाना खानने या गोंडस फोटोसोबत एक कॅप्शन दिली आहे. ज्यामध्ये तिने तिचे वडील आणि भावावर खूप प्रेम असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुहानाने फोटोसोबत लिहिले की, ‘आय लव्ह यू.’ शाहरुख खानसोबतचा आर्यन आणि सुहानाचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे.


PM Modi Europe Visit: पंतप्रधान मोदी ५ दिवस इटली- ब्रिटन दौऱ्यावर, G-20 बैठकीत होणार सहभागी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -