घरमनोरंजन'दबंग ३' मधून अश्वमीचं पदार्पण?

‘दबंग ३’ मधून अश्वमीचं पदार्पण?

Subscribe

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता आणि अभिनेता महेश मांजरेकरची मुलगी अश्वमी मांजरेकर आता 'दबंग ३'मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

 

सोनाक्षी सिन्हा, अथिया शेट्टी, डेझी शाह यांना बॉलीवूडमध्ये लाँच केल्यानंतर आता सलमान अजून एक नवा चेहरा प्रेक्षकांसमोर घेऊन येत असल्याची चर्चा आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता आणि अभिनेता महेश मांजरेकरची मुलगी अश्वमी मांजरेकर आता ‘दबंग ३’मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘दबंग ३’ मध्ये सलमानची हिरॉईन म्हणून अश्वमी पदार्पण करत असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

महेश आणि सलमानची मैत्री
महेश मांजरेकर आणि सलमानची मैत्री सर्वांनाच माहीत आहे. महेश हा सलमानच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. ‘दबंग १’ मध्ये सोनाक्षीच्या वडिलांच्या भूमिकेत महेश मांजरेकर दिसला होता. तर ‘वॉन्टेड’मध्येदेखील त्यानं पोलिसाची नकारात्मक भूमिका साकारली होती. तर ‘रेडी’मध्ये सलमानच्या विसरभोळ्या बापाचीदेखील महेशनं भूमिका केली होती. या चित्रपटानंतर मात्र महेश आणि सलमाननं परत काम केलं नाही.

अजूनही अरबाजनं यावर वक्तव्य केलं नाही
‘दबंग ३’ चं दिग्दर्शन प्रभुदेवा करणार असून अरबाज खान या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. मात्र सोनाक्षी सिन्हाबरोबर अश्वमीदेखील या चित्रपटात असणार का याबाबत अजूनही अरबाज अथवा सलमाननं कोणतंही वक्तव्य केलं नाही. मात्र चित्रपटासाठी लुक टेस्ट करण्यात आली असून बाकी कोणतीही बातमी देण्यास अरबाजनं नकार दिल्याचं समजतं. लवकरच या चित्रपटाची घोषणा करण्यात येईल अशी बातमी आहे.

- Advertisement -

सध्या सलमान खानचा रेस ३ प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी या चित्रपटानं २९ कोटीची कमाई केली आहे. या चित्रपटानंतर सलमान ‘दबंग ३’ आणि ‘भारत’च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -