घरमनोरंजनआस्ताद मंगळावर तर पुष्कर बिकिनीत

आस्ताद मंगळावर तर पुष्कर बिकिनीत

Subscribe

बिग बॉसमध्ये आज पुष्कर बिकिनी घालून घरातल्या सगळ्यांचेच होश उडवणार आहे, तर आस्ताद मंगळावरील लोकांशी मार्शियन भाषेत संवाद साधणार आहे.

सत्तर दिवस बिग बॉसच्या घरात काढल्यानंतर आता काहीही करून सनसनाटी करून ब्रेकिंग न्यूजमध्ये या असा बिग बॉसचा आदेश प्रेक्षकांसाठी वेगळेच मनोरंजन घेऊन येणार आहे. आज “होऊ दे चर्चा” या टास्कमध्ये सई आणि स्मिता, नंदकिशोर, पुष्कर आणि नंदकिशोर हे ब्रेकिंग न्यूज देण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर बाकीचे सदस्य सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. यामध्ये आऊ अर्थात उषा नाडकर्णी आणि शर्मिष्ठा यांचंदेखील भांडण होणार आहे.

पुष्कर दिसणार बिकिनीत

पुष्कर बिकिनी घालून घरातल्या सगळ्यांचेच होश उडवणार आहे. बिकिनीमधील पुष्कर वॅक्सिंगदेखील करणार आहे. “मला स्त्रियांबद्दल प्रचंड आदर आहे. सगळ्या वेदना त्यांच्याच नशिबी आल्या आहेत त्यामुळे त्यांना ज्या या वेदना होतात त्याला आज वॅक्स करून मी एकप्रकारे ट्रीब्युट देणार आहे” असं पुष्करचं म्हणणं आहे. तर सईचे फोटो कोणीतरी लपवले असल्याने ती आस्ताद, स्मिता यांना विचारणार आहे. ज्यावरून सई आणि स्मितामध्ये खूप भांडण होणार आहे. तसेच सई नंदकिशोर यांच्या डोक्यावर पीठ टाकणार आहे तसेच मेघा नंदकिशोर यांच्या डोक्यावर अंड फोडणार आहे. नंदकिशोर घरात आल्यापासून माणुसकी सोडून वागल्याचं न आवडल्यामुळं आणि ते त्यानं मान्यदेखील न केल्यामुळं सई अशी वागणार आहे.

- Advertisement -

आस्तादची वेगळीच सनसनाटी

आस्तादने आपल्या डोक्यावर चीप बसवली असून मंगळावरील लोकांशी आपण ‘मार्शियन’ या भाषेत संवाद साधत असल्याचं सांगून खळबळ माजवली. आधीच्या टास्कमध्ये पुढे असलेल्या मेघा आणि रेशमला रिपोर्टर आणि कॅमेरामॅन बनवण्यात आलं असून दुसऱ्या टास्कमध्ये पुष्कर आणि आस्तादची सनसनाटी गाजल्यामुळं या दोघांना रिपोर्टर आणि कॅमेरामॅनची भूमिका साकारताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -