घरमनोरंजन'कांतारा' चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद; जमवला 150 कोटींचा गल्ला

‘कांतारा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद; जमवला 150 कोटींचा गल्ला

Subscribe

अभिनेता ऋषभ शेट्टीचा कन्नड चित्रपट ‘कांतारा’ सध्या बॉक्स ऑफिसवर कल्ला करत आहे. या चित्रपटाने करोडोंची कमाई केली असून या चित्रपटाला प्रेक्षक भरघोस प्रतिसाद देऊ लागले आहेत. शिवाय हिंदी आणि इतर भाषेमध्ये देखील हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असलेले दिसून येत आहेत. कन्नडनंतर हिंदी आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पाच दिवसांच्या आत बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई करत आहे.

‘कांतारा’ ने जगभरामध्ये केली जबरदस्त कमाई
‘कांतारा’ चित्रपटाने फक्त भारतातच नाही तर जगभरातून जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटाने जगभरातून आत्तापर्यंत 150 कोटींचा आकडा पार केला असून प्रदर्शनाच्या पाचव्याच दिवशी 152 कोटींचा आकडा पार केला आहे. तसेच हिंदी भाषेमध्ये या चित्रपटाने आत्तापर्यंत 11.09 कोटींची कमाई केली आहे. तर तेलुगूमध्ये चित्रपटाने 14.03 कोटींची कमाई केली आहे.

- Advertisement -

कन्नडमध्ये ‘कांतारा’ने केला 100 कोटींचा आकडा पार
कन्नड भाषेमध्ये हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनाच्या 18 दिवसांमध्ये या चित्रपटाने जवळपास 100 कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटाचे यश पाहता निर्मात्यांनी ‘कांतारा’ 14 ऑक्टोबर रोजी हिंदीमध्ये देखील प्रदर्शित केला.

काय आहे ‘कांतारा’ची कथा?
‘कांतारा’ चित्रपटाची कथा ऋषभ शेट्टीने लिहिली असून चित्रपटात मुख्य भूमिका देखील त्यांनीच साकारली आहे. या चित्रपटाची कथा रहस्यमय आणि चित्तथरारक आहे. यामध्ये 1870 मधील काळ दाखवण्यात आला आहे.

- Advertisement -

 


हेहा वाचा :

त्या रात्री नेमक काय झालं? ‘मन कस्तुरी रे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -