घरमनोरंजन'कांतारा 2' चा धडकी भरवणारा जबरदस्त टीझर रिलीज

‘कांतारा 2’ चा धडकी भरवणारा जबरदस्त टीझर रिलीज

Subscribe

कन्नड सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा आगामी ‘कांतारा 2’ चित्रपटाचा फर्स्ट लूक काही तासांपूर्वी शेअर करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये ऋषभ एका जबरदस्त लूकमध्ये दिसत आहेत. रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये साधूच्या अवतारात ऋषभ शेट्टी प्रकाशाकडे बघताना दिसत आहे. त्याच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कुदळ आहे. त्याचवेळी तो दोरीला धरून आगीच्या गोळ्यातून बाहेर पडणाऱ्या लोकांकडे रागाने पाहत होता.

या पोस्टरसोबत चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला टीझरही रिलीज केला आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करताना निर्मात्यांनी लिहिलंय की, ‘दैवी पृथ्वीवर पाऊल टाका. कांताराचे फर्स्ट लूक पोस्टर आणि टीझर 7 भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे.” या चित्रपटाचा हा धमाकेदार पोस्टर पाहून चाहते उत्सुक झाले असून अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

- Advertisement -
कांताराची कथा

मानवता आणि निसर्ग यांच्यातील गुंतागुंतीच्या नातेसंबंधाचा शोध घेणार्‍या लोककथेवर आधारित असलेल्या ‘कांतारा’ चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांना भुरळ पाडत गेल्या वर्षी जागतिक स्तरावर विक्रम केला. डिसेंबरच्या अखेरीस या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. चित्रपटाच्या कलाकारांसंदर्भात अद्याप माहिती उघड करण्यात आलेली नाही.

 


हेही वाचा : सोशल मीडियावर दीपिका पादुकोणचा विंटर लूक चर्चेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -