घरमनोरंजनसलमानच्या 'भारत'चा Teaser रिलीज, कटरिना मात्र गायब

सलमानच्या ‘भारत’चा Teaser रिलीज, कटरिना मात्र गायब

Subscribe

'भारत' चित्रपटाच्या संपूर्ण टिझरमध्ये फक्त सलमानच आहे. चित्रपटात प्रमुख भूमिका असलेली कटरिना कैफही टिझरमध्ये कुठेच दिसत नाही.

अभिनेता सलमान खान याच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. ‘भारत’ चित्रपट नेमका कसा असणार? आणि त्यातील भाईजान अर्थात सलमानची भूमिका नक्की कशी असणार? याची चाहत्यांना जबरदस्त उत्सुकता होती. याच पार्श्वभूमीवर ‘भारत’ चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. सोशल मीडियावर सध्या हा टिझर तुफान व्हायरल होतो आहे. चित्रपटात सलमान खान आणि कटरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. खरंतर ‘भारत’चा टिझर २६ जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताकदिनी रिलीज होणार होता. मात्र, आज एक दिवस आधीच तो रिलीज करण्यात आला आहे. सध्या चित्रपटगृहांमध्ये ‘मणिकर्णिका’ आणि ‘ठाकरे’ या दोन मोठ्या चित्रपटांची हवा आहे. मात्र, दुसरीकडे सोशल मीडियावर सलमानच्या ‘भारत’चा बोलबाला आहे. ‘भारत’ चित्रपटाच्या संपूर्ण टिझरमध्ये फक्त सलमानच आहे. टिझरमध्ये दुसऱ्या कोणत्याच कलाकाराची साधी झलकही पाहायला मिळत नाहीये. चित्रपटात प्रमुख भूमिका असलेली कटरिना कैफही टिझरमध्ये कुठेच दिसत नाही. मात्र, या सगळ्यापलीकडे सलमानचे चाहते या टिझरला भरभरुन पसंती देत आहेत. युट्यूबवर काही वेळातच ‘भारत’च्या टिझरला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

टिझरमधून कॅट का गायब?

‘चित्रपटात प्रमुख भूमिका असूनही कटरिना ‘भारत’च्या टिझरमधून का गायब आहे?’, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कटरिना कैफला मुद्दामहून टिझरमधून वगळण्यात आलं आहे. यामागील कारण म्हणजे, कॅटची भारत चित्रपटात अत्यंत महत्वाची भूमिका असल्यामुळे त्या भूमिकेचा लूकही खूप खास आहे. अशातच ‘भारत’ चित्रपटाच्या प्रदर्शनला अजून ६ महिने बाकी आहेत. त्यामुळे कटरिनाची भूमिका आणि तिचा लूक लोकांसमोर येऊ नये यासाठीच तिला टिझरमधून वगळण्यात आल्याची चर्चा रंगते आहे. त्यामुळे ‘भारत’मधील कटरिनाच्या लूकविषयी आणि तिच्या कॅरेक्टरविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. ‘भारत’च्या ट्रेलरमधून तरी कॅटचा लूक सर्वांसमोर येईल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

- Advertisement -

अब्बास जफर यांनी ‘भारत’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अब्बासने सलमान खानच्याच ‘सुलतान’ आणि ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांचही दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सलमान आणि कॅटशिवाय दिशा पटानी, तब्बू, सुनील ग्रोवर आणि जॅकी श्रॉफ आदी कलाकारही झळकणार आहेत. अभिनेता वरुण धवनचाही चित्रपटात कॅमिओ रोल असणार आहे. ‘भारत’ हा चित्रपट ‘ओड टू माय फादर’ या कोरिअन नाटकावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान आणि कटरिनाची लाडकी जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -