घरमनोरंजनसलमान खानही आता काँग्रेसच्या वाटेवर?

सलमान खानही आता काँग्रेसच्या वाटेवर?

Subscribe

सलमान खानने त्याच्या बालपणातील बराचसा काळ इंदौरमध्येच व्यथित केला आहे. त्यामुळे सलमान आपल्या जन्मगावातून ही निवडणूक लढवणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री करिना कपूर काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधून निवडणुक लढवण्याची ऑफर करिनाला देण्यात आल्याची सगळीकडे जोरदार आहे. त्यापाठोपाठ आता बॉलीवूडचा ‘भाईजान’ म्हणजेच सलमान खान यालासुद्धा काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात येणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. उपलब्ध माहितीनुसार, मध्य प्रदेशच्याच इंदौर शहरातून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर काँग्रेसकडून सलमान खानला देण्यात येणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन राकेश यादव यांनी केलेल्या वक्तव्यानुसार, ‘इंदौरमधून लढवण्यात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा उमेद्वार म्हणून, सध्या पक्षात सलमान खानच्या नावाची चर्चा आहे.’ राकेश यादव यांच्या म्हणण्यानुसार, ‘सलमान खान यांनी जर निवडणूक लढवली तर त्यामुळे इंदौरमधील तरूण-तरूणींना चित्रपटसृष्टीचा जवळून अनुभव घेता येईल.’

जन्मगावातून लढवणार निवडणूक?

विशेष बाब म्हणजे सलमान खानचा जन्मही इंदौरचाच आहे. सलमानने त्याच्या बालपणातील बराचसा काळ इंदौरमध्येच घालवला आहे. त्यामुळे सलमान आपल्या जन्मगावातून ही निवडणुक लढवणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आसणार. सलमान त्याच्या व्यस्त शेड्युलमधून जमेल तसा वेळ काढून इंदौरला भेट देत असतो. इतकंच नाही तर त्याने आजवर अनेकदा इंदौर शहराविषयीचं आपलं प्रेम जाहीरपणे व्यक्तदेखील केलं आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रत्यक्षात सलमान खानला इंदौरमधून निवडणूक लढवण्याची ऑफर देणार का? आणि सलमान ती ऑफर स्वीकारणार का? याचा उलगडा लवकरच होईल.

- Advertisement -

उपलब्ध माहितीनुसार, मध्य प्रदेशमधून करिना कपूर आणि सलमान खान यांनी निवडणूक लढवण्याची आपली इच्छा, एमपी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे बोलूनही दाखवली आहे. मध्यप्रदेशमधील भोपाळची सीट करिना कपूरला तर इंदौरची सीट सलमाम खानला देण्यात यावी असे काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मनात आहे. सूत्रांनुसार, यामागील मुख्य कारण म्हणजे ‘लोकसभा निवडणुकांसाठी मध्यप्रदेशच्या सीट्सवर भाजपाने आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्यास, काँग्रेसकडून हे दोन लोकप्रिय चेहरे त्यांचं वर्चस्व प्रस्थापित करु शकतील.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -