घरमनोरंजनBigg Boss 3 Marathi Grand Finale : बिग बॉस मराठी ३ ची...

Bigg Boss 3 Marathi Grand Finale : बिग बॉस मराठी ३ ची ट्रॉफीसाठी विशाल, जय, मीनलमध्ये काँटे की टक्कर, कोण जिंकणार?

Subscribe

सध्या मनोरंजन विश्वात बिग बॉस मराठी ३ हा शो चांगलाच गाजवतोय. प्रेक्षकांकडून या शोला चांगलीच पसंती मिळतेय. बिग बॉस मराठी ३ चा ग्रँड फिनाले आज अर्थात २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सुरु होणार आहे. या ग्रँड फिनालेच्या शेवटी बिग बॉस मराठी ३ सीझनच्या विजेत्या पदाची ट्रॉफी आणि बक्षीस कोण घेऊन जाणार तसेच बिग बॉसच्या घराचे दिवे कोण बंद करुन बाहेर पडणार हे समजणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता देखील शिगेला पोहचली आहे. यंदा टॉप ५ स्पर्धकांमध्ये (Bigg Boss Marathi 3 Grand Finale)विशाल निकम, मीनल शाह, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे या स्पर्धकांनी आपले नाव निश्चित केलेय.

सध्या सोशल मीडियावरही बिग बॉस मराठी ३ चा संभाव्य विजेता कोण असेल याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यात तिकीट टू फिनाने मिळालेला विशाल निकम हा बिग बॉस मराठी ३ चा विजेदेपदासाठी फेवरेट मानला जातोय.  सोशल मीडियावर विविध पोल्स पाहिले तर विशाल निकम बिग बॉस ३ चा विजेता होईल असे म्हटले जातेय. विशालचा सोशल मीडियावरही जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. विशाल एक फेअर गेम खेळणारा स्पर्धक मानला जातोय. त्यामुळे विशाल विजेतेपदाची ट्रॉफी जिंकेल असे मानले जातेय.

- Advertisement -

यानंतर दुसऱ्या स्थानी जय दुधाणेचे नाव घेतले जाते. जय दुधाणेने घरातील सर्व स्पर्धकांना आपल्या फिटनेसने वेड लावले. या शोमध्ये तो अतिशय रागीट आणि तापट स्पर्धक मानला जायचा. त्यामुळे अनेकदा गेममध्ये जय आणि विशालची काटे की टक्कर पाहायला मिळाली. ज्यामुळे जय दुधाणे आज विशालला मागे टाकत बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार की त्याला  उपविजेतेपदावर समाधान मानावे लागणार हे समजणार आहे.

मराठी टेलिव्हिजन गाजवणारा विकास पाटील बिग बॉस मराठी ३ च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये पोहोचला आहे. आपल्या दमदार खेळीने आणि आर्ग्युमेंटमुळे त्याने प्रेक्षकांची मनं जिंकवली. त्यामुळे विकासलाही प्रेक्षकांनी तिसरा क्रमांक दिला आहे.

- Advertisement -

बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वात टॉप ५ मध्ये मीनल शाह ही एकमेव महिला स्पर्धक ठरली आहे. त्यामुळे बिग मराठी सीझन ३ मध्ये मीनल शाह फिमेल विनर ठरली आहे. मीनलने पुरुष स्पर्धकांना काटे की टक्कर देत स्वत;ची वेळी जागा निर्माण केली आहे. त्यामुळे मीनल शाहलाही सोशल मीडियावर चौथ्या क्रमांक दिला जातोय.

आपल्या हटके गाणी, कविता, आणि मास्टर माईंड म्हणून फेमस असलेला शिंदेशाही घराण्याची शान उत्कर्ष शिंदे यानेही टॉप ५ मध्ये स्थान मिळावले आहे. घरात स्पर्धकांना इंटटेन्ट करण्यात उत्कर्षचा मोठा सहभाग आहे. कोणाशीही वाद न घालता अतिशय नम्रपणे समोरच्याला आपल्या बाजूने करुन घेण्यात उत्कर्षचा हातखंड होता. म्हणून प्रेक्षकांनाही त्याला पसंती दिली. मात्र अंतिम फेरीतून उत्कर्ष पहिला बाद होणारा स्पर्धक ठरू शकतो असा प्रेक्षकांचा अंदाज आहे. कारण जयसोबत खेळताना उत्कर्ष स्वत: अनेकदा दिसलाच नाही. यंदा विजेत्याची बक्षीस रक्कम आधी २५ लाख होती, पण आता ती २० लाखांवर पोहचली आहे.


भारतीय महिलांची गगन भरारी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -