घरमनोरंजनहा गोंडस मुलगा आहे प्रसिद्ध अभिनेता; वडिलही होते बालकलाकार

हा गोंडस मुलगा आहे प्रसिद्ध अभिनेता; वडिलही होते बालकलाकार

Subscribe

सिनेक्षेत्रात पिढ्यान पिढ्या काम करणारे कलाकार आपण पाहिले आहेत. अशाच एका कुटुंबातील बालकलाकाराची परंपरादेखील सिनेचाहत्यांना माहिती आहे. ते कुटुंब म्हणजे कोठारे कुटुंब. सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे हादेखील चित्रपटसृष्टीत करिअर करत असून त्यानेही वडिलांप्रमाणे बालकलाकार म्हणून पदार्पण केले होते. आज आदिनाथच्या वाढदिवसानिमित्त त्याचे वडिलांसोबतचे हे कनेक्शन जाणून घेऊया. आदिनाथ कोठारे याने वडिल महेश कोठारे यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या माझा छकुला चित्रपटातून पहिल्यांदा बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने अभिनेता म्हणूनही अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आदिनाथचा ८३ हा हिंदी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

- Advertisement -

बालकलाकार महेश कोठारे 

सध्या नामवंत दिग्दर्शक, अभिनेता असलेले महेश कोठारे यांनीही बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. काही हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्यानंतर त्यांनी अभिनेता म्हणून मराठी चित्रपटांमध्ये करिअरची सुरूवात केली. पुढे ते दिग्दर्शनाकडे वळले. त्यांच्या निर्मितीखाली अनेक चित्रपट, मालिका बनल्या आहेत.

बालकलाकार महेश कोठारे

हेही वाचा –

खबरदार कोरोनाबाबत जगाला माहिती दिली तर…, चीनने WHOला दिली होती धमकी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -