घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटखबरदार कोरोनाबाबत जगाला माहिती दिली तर..., चीनने WHOला दिली होती धमकी

खबरदार कोरोनाबाबत जगाला माहिती दिली तर…, चीनने WHOला दिली होती धमकी

Subscribe

कोरोना विषाणूबद्दल लवकर माहिती देऊ नका, नाही तर आम्ही कोरोनावरील तपासणी करण्यास चीन सहकार्य करणार नाही अशी धमकी चीनने दिली होती, असा दावा करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (सीआयए) चा संदर्भ देत एका अहवालात दावा करण्यात आला आहे की कोरोना विषाणू विषयी जागतिक चेतावणी देऊ नका, अशी धमकी चीनने जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) दिली होती. यापूर्वी, जर्मन फेडरल इंटेलिजेंस सर्व्हिस बुंडेस्नाच्रीचेंडिएंट (Bundesnachrichtendienst) (बीएनडी) यांनीही अशा प्रकारच्या वृत्तांचा उल्लेख केला आहे.

न्यूजवीक.कॉमच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की सीआयएला हे समजलं आहे की जगाने कोरोनाबद्दल सतर्क होण्यास उशीर करण्यासाठी चीनने WHOवर दबाव आणला. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात चीनने WHOला सांगितलं की जर WHOने जागतिक चेतावणी दिली तर ते जागतिक आरोग्य संघटनेला कोरोनावरील तपासणी करण्यास सहकार्य करणार नाही. अहवालात म्हटलं आहे की जानेवारीच्या सुरूवातीला चीनने जागतिक चेतावणीला धमकी दिली होती. अमेरिकेसह इतर देशांमधून उत्पादित पीपीईसह इतर वैद्यकीय उपकरणे चीनमध्ये जमा करण्यात चीन गुंतलेला असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरून काम करण्याची परवानगी


हा दावा ‘यूएन-चायना: WHO माइंडफुल बट नॉट ह्यूमन टू चाइना’ या दस्तऐवजाच्या आधारे करण्यात आला आहे. न्यूजवीकने अमेरिकेच्या दोन इंटेलिजेंस अधिकाऱ्यांद्वारे याबाबतची माहिती मिळवली. तत्पूर्वी, जर्मन न्यूज मासिका ‘डेर स्पीगल’ ने देशाच्या फेडरल इंटेलिजेंस सर्व्हिसच्या माहितीच्या आधारे असा दावा केला होता की चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर जनरल टेड्रोस घेब्रेयसस यांना वैयक्तिकरित्या सांगितले होतं की, कोरोना विषाणूबद्दल जागतिक चेतावणी देण्यास त्यांनी उशीर करावा. तथापि, WHOने हा दावा फेटाळून लावला.

- Advertisement -

‘डेर स्पीगल’ ने बीएनडीद्वारे म्हटलं होतं – “२१ जानेवारीला चिनी नेते शी जिनपिंग यांनी WHOचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयसस यांना कम्यूनिटी ट्रांसमिशनविषयी माहिती देण्यास उशीर करण्यास सांगितलं.” WHOने म्हटलं आहे की टेड्रोस आणि जिनपिंग यांच्यात कधीही फोन संभाषण झालेलं नाही. त्याचबरोबर न्यूजवीकच्या म्हणण्यानुसार, WHOने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की, WHO सदस्य देशांशी झालेल्या विशिष्ट चर्चेवर प्रतिक्रिया देत नाही. परंतु संस्थेने नेहमीच लोकांचे प्राण वाचविण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -