घरताज्या घडामोडीअनुष्का प्रेग्नन्सीचे कपडे विकणार अन् पाणीही वाचवणार

अनुष्का प्रेग्नन्सीचे कपडे विकणार अन् पाणीही वाचवणार

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच समाजकार्यात सहभाग घेताना दिसत असते. अलीकडेच अनुष्का आणि विराटने कोरोनाच्या काळात लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले होते. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारे अनुष्का काम करत आहे. अनुष्का आपल्या गरोदरपणात घातलेले कपडे विकून यातील मिळालेले पैसे मातेच्या आरोग्यास समर्थन करण्यासाठी आणि २.५ लाख लीटर पाणी वाचवण्यासाठी दान करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

यावर्षी जानेवारी महिन्यात अनुष्का शर्माने मुलगी वामिकाला जन्म दिला. या गरोदरपणात अनुष्काने खूप सुंदर कपडे घालत होते. तिने आपल्या बेबी बम्प सोबत अनेक फोटो शेअर केले होते. आता गरोदरपणातील हेच कपडे अनुष्काने विकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अनुष्काने स्वतः इन्स्टाग्रामवर माहिती दिली आहे. तिने सांगितले की, सर्कुलर इकोनॉमी वाढवण्यासाठी तिने हे पाऊल उचलले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

- Advertisement -

अनुष्का शर्माच्या पसर्नल लाईफबद्दल बोलायचे झाले तर, तिने २०१७मध्ये विराट कोहली सोबत लग्न केले. लग्नाच्या तीन वर्षानंतर ११ जानेवारी २०२१ला अनुष्काने वामिकाला जन्म दिला. वामिकाला जन्म दिल्यापासून आतापर्यंत तिने मुलीचा चेहरा कॅमेरा समोर कधीच आणला नाही आहे. अनुष्का आणि विराट मीडिया कव्हरेजला कंटाळून सर्व पत्रकारांना विनंती केली होती की, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हाच स्वतः आपल्या मुलीचा चेहरा दाखवतील. त्यामुळे मागे येऊ नका आणि त्यांच्या प्रायव्हेसीची काळजी घ्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -