रक्षाबंधन हा सण आज ३ ऑगस्ट रोजी देशभरात साजरा केला जात आहे. दरवर्षी सर्वसामान्यांपासून ते सेलेब्रिटीपर्यंत हा सण खूप खास असतो. रक्षाबंधन या सणाच्या पंतप्रधानांपासून अनेक दिग्गज नेत्यांनी शुभेच्छा दिल्यात तर या खास प्रसंगी बॉलिवूड सेलिब्रिटींनीही रक्षाबंधनासाठी त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन ते रिया कपूरपर्यंत प्रत्येकाने आपल्या भावंडांच्या खास बॉन्डिंगचे स्पेशल फोटो शेअर केले आहेत.
अमिताभ यांनी तीन फोटोंचे कोलाज शेअर केले आहे, ज्यात अभिषेक बच्चन-श्वेता बच्चन यांचे बालपण आणि आताचे तसेच आराध्या बच्चन आणि अगस्त्य नंदा यांचा फोटो आहे. हे फोटो शेअर करताना त्यांनी असे लिहिले – ‘बहिणीचे रक्षण करण्याचे वचन, तिच्या बाजूने उभे राहण्याचे, संकटात तिचा हात धरण्याचे वचन, तिला वाईटापासून वाचवण्याचे वचन आणि याची तिला जाणीव करून देण्याचे वचन, आणि नेहमीच तिच्यासाठी हजर…’
रिया कपूरनेही तिची बहीण सोनम कपूर आणि भाऊ हर्ष वर्धन यांचा व्हिडिओही शेअर केला आहे. रक्षाबंधनच्या या खास दिवशी त्यांचा हा व्हिडिओ सिबलिंग गोल्स दर्शवत आहे.
हर्षवर्धनने रिया कपूर आणि सोनम कपूर या दोन्ही बहिणींसोबतचे व्हिडिओही शेअर केले आहेत.
मलायका अरोरा हिने रक्षाबंधनवर बहिण अमृता अरोराबरोबर एक फोटो शेअर केला आहे. तिने असे लिहिले- तुम्ही फक्त माझी लहान बहिणच नाही तर उत्तम मैत्रिण, मोठी बहीण आणि भाऊही आहेस.
वेळ ही जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. आणि ती वेळ तुझ्यासह शेअर करू शकणारी सर्वात मौल्यवान भेट आहे, असे कॅप्शन देत नेहा कक्करने आपल्या भावासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.