घरदेश-विदेश'या' व्यक्तीला मिळाले अयोद्धेतील रामजन्मभूमी पूजेचे पहिले आमंत्रण!

‘या’ व्यक्तीला मिळाले अयोद्धेतील रामजन्मभूमी पूजेचे पहिले आमंत्रण!

Subscribe

निमंत्रित करण्यात आलेल्या या पहिल्या व्यक्तीविषयी जाणून घ्या...

अयोध्येत रामजन्मभूमी पूजेची तयारी जोरात सुरू असून त्यासाठी मान्यवरांना आमंत्रण देखील पाठविण्यात येत आहे. अयोध्या प्रकरणातील मुस्लिम पक्षाच्या इक्बाल अन्सारी यांना या रामजन्मभूमीचे पहिले आमंत्रण पाठविण्यात आले आहे. हे आमंत्रण त्यांना राम मंदिर ट्रस्टचे महंत चंपत राय यांनी पाठवले असल्याचे सांगितले जात आहे. इक्बाल अन्सारीसह असलेल्या मुस्लिम पक्षाच्या हाजी मेहबूब यांनाही निमंत्रण देण्यात आले असून बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार्‍या पद्मश्री मुहम्मद शरीफ यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे.

- Advertisement -

इक्बाल अन्सारी म्हणाले की, रामजन्मभूमी पूजनाचे आमंत्रण मिळाल्यामुळे मला आनंद झाला आहे आणि या कार्यक्रमात ते नक्कीच सहभागी होणार आहेत. ते म्हणाले की, रामललाच्या भव्य मंदिरासाठी सुप्रीम कोर्टाने ही जागा दिली असून आता कोणताही वाद नाही. इक्बाल अन्सारी असेही म्हणाले की, ते नेहमीच संत आणि साधू यांच्या सहवासात राहिले असल्याने त्यांना रामबद्दल फार आदर आहे.

कदाचित राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी त्यांना प्रथम आमंत्रण मिळावे हीच भगवान रामाची इच्छा असेल आणि मी हे मला मिळालेलं पहिले आमंत्रण स्वीकारत आहे, असे इक्बाल अन्सारी यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

दरम्यान, अयोध्येत ५ ऑगस्टला होणार्‍या राम मंदिर भूमीपूजनाची तयारी जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अयोध्येत जाणार असून पूजनाचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रविवारी भेट देणार होते. परंतु त्यांचे सहकारी कॅबिनेट मंत्री कमला राणी वरुण यांच्या निधनानंतर त्यांनी हा दौरा रद्द केला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज दुपारच्या वेळात अयोध्येत पोहोचतील आणि संध्याकाळपर्यंत तिथेच असणार असून यावेळी मुख्यमंत्री या तयारीचा आढावा घेणार आहेत. याखेरीज पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासंदर्भात अधिकाऱ्यांसह बैठक देखील घेणार आहेत.


अयोध्येत गणेश पूजनाने श्री राम मंदिर भूमीपूजनाचा ‘श्री गणेशा’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -