घरमनोरंजनअर्जुनला शोधतेयस का? एअरपोर्टवर लेकाला भेटायला गेलेली मलायका झाली ट्रोल

अर्जुनला शोधतेयस का? एअरपोर्टवर लेकाला भेटायला गेलेली मलायका झाली ट्रोल

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा एक्स पती अरबाज खान अनेक वर्षांनंतर एकत्र दिसले. दोघे स्टार्स त्यांचा मुलगा अरहानला घेण्यासाठी मुंबई एअरपोर्टवर पोहोचले होते. अरहान परदेशात शिक्षणासाठी गेला होता मात्र शुक्रवारी रात्री तो मुंबईतील त्याच्या घरी परतला. यादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यामुळे मलायकाला युजर्सनी चांगलेच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

यामुळे मलायका झाली ट्रोल

या व्हिडिओमध्ये मलायका अरोरा आणि अरबाज खान त्यांचा मुलगा अरहानला घेण्यासाठी मुंबईत एअरपोर्ट पोहचल्याचे पाहायला मिळाले. यात मलायका एअरपोर्टवरचं मुलगा अरहानला मिठी मारते. खूप दिवसांनी मुलगा भेटल्यानंतरचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. मात्र मलायका अरोरा आणि अरबाज एकमेकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसले. या व्हिडिओमध्ये दिसतेय की, अरहान मलायकाला मिठी मारतो. आणि नंतर अरहान आणि अरबाज पुढे चालायला लागतात. त्याचवेळी मलायका अरोरा त्यांच्यामागे येते आणि इकडे तिकडे पाहू लागते. यामुळे मलायका अरोरा चांगलीच ट्रोल होतेय.

अर्जून कपूरच्या नावाने केले जातेय ट्रोल

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून मलायकाचा व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओवर एका युजरने कमेंट करत लिहिले की, अर्जुन पतली गल्लीने निघून तर केला नाही ना. तर दुसर्‍या युजरने लिहिले की, अरबाजकडे बघा कसा एक्स पत्नीकडे दुर्लक्ष करतोय. तर तिसरा एका युजरने लिहिले की, अर्जुनला शोधतेयस का?

- Advertisement -

चार वर्षांपूर्वी झाला मलायका- अरबाजचा घटस्फोट

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा २०१७ मध्ये वर्षात घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर हे दोघे क्वचितच एकत्र दिसले असतील. मलायका अरोरा सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. अलीकडेच मलायका आणि अर्जून मालदीवमध्ये व्हेकेशन सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते, ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले होते. दुसरीकडे अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते.


परवानगीशिवाय पत्नीचे कॉल रेकॉर्ड करणे खासगी अधिकाराचे उल्लंघन; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -