घरक्रीडाNathan Lyon : ४०० व्या विकेटसाठी नॅथन लायनलची ३२६ दिवस प्रतिक्षा, ठरला...

Nathan Lyon : ४०० व्या विकेटसाठी नॅथन लायनलची ३२६ दिवस प्रतिक्षा, ठरला सातवा स्पिनर

Subscribe

ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड कसोटी अॅशेस कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज असलेल्या नॅथन लायनच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद आज झाली. ऑस्ट्रेलियन गोलंदाज नॅथन लायनने आपल्या ४०० व्या विकेटसाठी तब्बल ३२६ दिवसांची वाट पाहिली. डेविड मलानला आऊट करत लायनने आपला ४०० वा बळी घेतला. हा रेकॉर्ड करणारा नॅथन लायन तिसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ४०० विकेट घेणारा नॅथन लायन सातवा खेळाडू ठरला आहे. कधी काळी पिच क्यूरेटर काम करणारा गोलंदाजाने आपल्या ४०० व्या विकेटसाठी ३२६ विकेटची वाट पाहिली.

नॅथन लायनने २०१० साली एडीलेड ओवल मैदानात आपल्या पीच क्यूरेटरच्या नोकरीची सुरूवात केली होती. त्यानंतर एका वर्षानंतर लायनने आपला पहिला कसोटी सामना खेळला. पण ३४ वर्षीय नॅथन लायन आता ४०० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या रांगेत जाऊन बसला आहे. आपल्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत कायम उत्तमोत्तम खेळ करणाऱ्या लायनने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. आतापर्यंतच्या १०१ टेस्ट मॅचेसमध्ये त्याने ४०३ विकेट्स घेतले आहेत.

- Advertisement -

एशेज मालिकेतील कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी डेविड मलानची ४०० वी विकेट त्याने घेतली. याआधी ऑस्ट्रेलियाकडून लेग स्पिनर शेन वॉर्न आणि ग्लेन मॅकग्राने हा विक्रम केला आहे. शेन वॉर्नने ७०८ विकेट्स घेतले आहेत. तर मॅकग्राने ५६३ विकेट्स घेतले आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये लायनचा क्रमांक हा ४०० विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत सातवा आहे. मुरलीधरन आणि वॉर्ननंतर अनिल कुंबले (619), रंगना हेराथ (433), अश्विन (427), हरभजन सिंह (417) आणि लायनचा क्रमांक लागतो.

- Advertisement -

कोणत्या गोलंदाजांच्या नावे ४०० विकेट्स ?

मुथैया मुरलीधरन – 800 विकेट
शेन वार्न – 708 विकेट
जेम्स एंडरसन – 632 विकेट
अनिल कुंबले- 619 विकेट
ग्लेन मैकग्रा- 563 विकेट
स्टुअर्ट ब्रॉड- 524 विकेट
कॉर्टनी वॉल्श- 519 विकेट
डेल स्टेन- 439 विकेट
कपिल देव- 434 विकेट
रंगाना हेरथ- 433 विकेट
रिचर्ड हेडली- 431 विकेट
रविचंद्रन अश्विन- 427 विकेट
शॉन पोलॉक- 421 विकेट
हरभजन सिंह- 417 विकेट
वसीम अकरम- 414 विकेट
कर्टनी एम्ब्रोस- 405 विकेट
नाथन लियोन- 403 विकेट


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -