घरमनोरंजनबॉलीवूड स्टार्सचा स्वातंत्र्य दिन

बॉलीवूड स्टार्सचा स्वातंत्र्य दिन

Subscribe

संपूर्ण भारत ७२ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. तर बॉलीवूडचे स्टार्सदेखील मागे कसे राहतील. आपल्या अंदाजात प्रत्येकाने स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. बॉलीवूडमधील स्टार्स आपल्या अंदाजात स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर बरचे स्टार्स अॅक्टिव्ह असल्यामुळे शुभेच्छा आणि फोटो पोस्ट करत आहेत. बॉलीवूड म्हटलं की, सर्वात पहिले आपण जाणून घेणार आहोत, ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल. आजच्या दिवशी अभिताभ यांनी आपले वडील हरिवंश राय बच्चन यांची कविता ट्विटर हँडलवर पोस्ट करून देशवासियांना स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आपण स्वतंत्र आहोत आणि स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा यानिमित्तानं पूज्य बाबूजींची एक कविता’ अशी कॅप्शन अमिताभ यांनी दिली आहे.

- Advertisement -

सलमान आणि अक्षयच्या भावनिक शुभेच्छा

बॉलीवूडच्या ‘दबंग’ सलमान खाननं आपल्या चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केलं आहे. ‘सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आर्थिक स्वरुपात स्वतंत्र राहा मात्र भावनात्मक रूपानं आश्रित राहण्याचा प्रयत्न करा आणि सर्वांना सुख द्या’ अशी कॅप्शन सलमाननं दिली आहे. तर बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षयकुमारनं देशाचे जवान आणि देशाच्या रक्षकांना सलाम करत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘स्वतंत्रता कधी मुक्त होत नाही. आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी लढा दिला आणि जे लोक आपल्या सुरक्षेसाठी दिवस – रात्र सीमेवर लढत आहेत, त्या सर्वांना सलाम करूया. एक चांगला भारत बनवण्यासाठी काम करूया. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा,’ असं ट्विट अक्षयकुमारनं केलं आहे.

- Advertisement -

रणवीर सिंहच्या जोशपूर्ण शुभेच्छा

रणवीर सिंह आपल्या नेहमीच्याच जोशात शाळेतील मुलांबरोबर स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून रणवीरनं एक फोटो शेअर केला आहे. शाळेतील मुलांबरोबर उभा राहून त्यानं हातात तिरंगा फडकवत फोटो पोस्ट केला आहे. ‘आपल्या युवा राष्ट्र भवितव्य आहे’ अशी कॅप्शन रणवीरनं लिहिली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -