घरदेश-विदेशकेरळात पावसाचा जोर कायम, कोची विमानतळ शनिवारपर्यंत बंद

केरळात पावसाचा जोर कायम, कोची विमानतळ शनिवारपर्यंत बंद

Subscribe

दक्षिणेकडील राज्यांना सध्या पावसाने झोपडून काढले आहे. आठवडयाभरापासून कोसळणाऱ्या पावसाने अनेक राज्यांना फटका बसला असून ४४ जणांचा मृत्यू झाला आहे.

केरळमध्ये पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. आता पावासाचा जोर वाढल्यामुळे हवाई सेंवावरही परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे येत्या शनिवारपर्यंत कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस केरळला जाऊ इच्छिणाऱ्यांना हवाईसेवेचा उपयोग करता येणार नाही.

पावसाने झोडपले

दक्षिणेकडील राज्यांना सध्या पावसाने झोपडून काढले आहे. आठवडयाभरापासून कोसळणाऱ्या पावसाने अनेक राज्यांना फटका बसला असून ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक गावे अद्यापही पाण्याखाली आहेत. तर अनेकांशी संपर्क तुटला आहे. विमानतळावरील रनवे वर पाणी साचल्याने विमान प्रशानसनाकडून हा तातडीचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

ओणमही नाही झाला साजरा

दक्षिणेकडे ओणम हा सण सगळ्या मोठया उत्साहात साजरा केला जातो. यंदा १५ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट ओणम साजरा केला जाणार होता. पण पावसाने या आनंदावर विरजण टाकले. पावसामुळे अनेक सेवांवर परिणाम झाला आहे आणि आता हवाईसेवा बंद झाल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे.  केरळचे मुख्यमंत्री पिरनई विजयन यांनी ओणमनिमित्त आयोजित केलेले सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा केली आहे.पावसाची भयावह स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खर्च केला जाणारा निधी पुरग्रस्तांना देण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

अनेकांचे स्थलांतर

तामिळनाडूतील पेरियार नदीला पूर आला असून या नदीच्या किनाऱ्यालगत असलेल्या तब्बल १ हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. याशिवाय येथील मुल्लापेरियार धरण क्षमतेपेक्षा अधिक भरले. त्यामुळे धरणाचे १३ दरवाजे सकाळी ४.३० वाजता उघडण्यात आले आहेत. या धरणाचे पाणी सोडल्यामुळे धरणाशेजारी असलेल्या गावांचे देखील स्थलांतर करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -