घरमनोरंजनडिसेंबर महिन्यात हे सेलिब्रिटी चढणार बोहल्यावर

डिसेंबर महिन्यात हे सेलिब्रिटी चढणार बोहल्यावर

Subscribe

दीपिका आणि रणवीरच्या लग्नानंतर आता आणखी काही सेलिब्रिटी लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहेत.

बी टाऊनमध्ये सध्या लग्नाचा मौसम सुरु आहे. दीपिका आणि रणवीरच्या लग्नानंतर आता आणखी काही सेलिब्रिटी लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहेत. म्हणजे प्रियांका आणि नीक जोनास शिवायही सेलिब्रिटी जोडया विवाहबंधनात अडकणार आहेत. जाणून घ्या या सेलिब्रिटींच्या लग्नाविषयी अधिक

कोणत्या जोड्या अडकणार लग्नाच्या बेडीत ?

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल

दुसरी जोडी आहे ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांची.. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिचं लग्न येत्या १२ डिसेंबर रोजी लग्न बंधनात अडकणार आहे. सध्या ईशाच्या प्री- वेडिंग सेरेमनीजला सुरुवात झाली आहे. लग्नाआधी अंबांनीच्या घरी गृहशांती पूजा केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार इशा ४२५ कोटींच्या आलिशान बंगल्यात राहणार आहे. वरळीमध्ये हा बंगला असून ईशाला तिची सासू हा बंगला भेट म्हणून देणार आहे.

- Advertisement -

 

 

View this post on Instagram

 

#ishaambani at a puja ceremony today

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

- Advertisement -

 

श्वेता बासू प्रसाद – रोहित मित्तल

मकडीमधील बाल कलाकार श्वेता बासू प्रसाद येत्या १३ डिसेंबर रोजी लग्न बंधनात अडकत आहे. श्वेता बॉयफ्रेंड रोहित मित्तल सोबत लग्न करणार आहे. तिचे लग्न बंगाली आणि मारवाडी अशा दोन्ही पद्धतीने करणार आहे. ही दोघं गेल्या ४ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत आणि गेल्या २ वर्षांपासून ते लिव्ह- इन- रिलेशनशीपमध्ये राहत आहेत. सध्या श्वेता बालीमध्ये असून ती तिची बॅचलरेट पार्टी एन्जॉय करत आहे.

 

View this post on Instagram

 

Need ur blessings ??

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

 

View this post on Instagram

 

Need ur blessings ??

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

कपिल शर्मा आणि गिन्नी

कपिल शर्माची लग्नपत्रिका देखील समोर आली आहे. सोशल मीडियावर कपिलने त्याची पत्रिका शेअर केली आहे.कपिल शर्मा गर्लफ्रेंड गिननी चतरथ सोबत १२ डिसेंबरला जालंदरमध्ये लग्न करणार आहे. १० डिसेंबरला जागरण आहे. त्यानंतर चुडा सेरेमनी, मेहंदी, कॉकटेल पार्टी असणार आहे आणि १२ ला कपिलचे लग्न असणार आहे. तर १४ डिसेंबर रोजी अमृतसरमध्ये मोठे रिसेप्शनदेखील होणार आहे.

 

View this post on Instagram

 

Need ur blessings ??

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

राखी आणि दीपक कलाल

बॉलीवूडची ड्रामा क्विन राखी सावंतही लग्न करत आहे, असे कळत आहे. कारण तिने स्वत:च तिची पत्रिका इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सोशल मीडियावर विचित्र व्हिडिओ करुन शेअर करणाऱ्या दीपक कलाल सोबत ती लग्न करणार आहे. असे कळत असले तरी ती या संदर्भातील खुलासा लवकरच करणार आहे. असे तिने सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -