घरमनोरंजनअवघ्या 3 दिवसात 'दगडीचाळ 2'चा 2 कोटीहून अधिक गल्ला

अवघ्या 3 दिवसात ‘दगडीचाळ 2’चा 2 कोटीहून अधिक गल्ला

Subscribe

हा चित्रपट 350 हून अधिक स्क्रीन वर दाखवला जात आहे. प्रेक्षकांचा मिळणारा तुफान प्रतिसाद खरंच थक्क करणारा ठरला आहे. दहीहंडीच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून अवघ्या 3 दिवसात 2 कोटींचा कमाल गल्ला जमवला आहे.

मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ 2’ ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. 2015 ला आलेल्या दगडीचाळ नंतर यंदा ‘दगडीचाळ 2’ ने यशाचा झेंडा रोवला आहे. तब्बल 7 वर्ष प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात झुंबड उडवली आहे. प्रत्येक डायलॉगवर शिट्ट्या असो किंवा टाळ्यांचा नाद असो, आख्या महाराष्ट्रात या चित्रपटाने तुफान आणले आहे.

हा चित्रपट 350 हून अधिक स्क्रीन वर दाखवला जात आहे. प्रेक्षकांचा मिळणारा तुफान प्रतिसाद खरंच थक्क करणारा ठरला आहे. दहीहंडीच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून अवघ्या 3 दिवसात 2 कोटींचा कमाल गल्ला जमवला आहे. गेला शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट 2022 ला पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 51 लाख तर दुसऱ्या दिवशी 70 लाख आणि तिसऱ्या दिवशी चक्क 83 लाखाचा विश्वसनीय गल्ला जमवलेला आहे. ‘शंभो’ म्हणत आख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या मकरंद देशपांडे यांचा कमाल अभिनय, सूर्याची भूमिका साकारणारा चॉकलेट बॉय अंकुश चौधरी तर कलरफुल पूजा सावंतने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांचा आणि समिक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावर फक्त आणि फक्त ‘दगडीचाळ 2’ चा डंका वाजताना दिसत आहे.

- Advertisement -

निर्मात्या संगीता अहिर म्हणतात,” प्रेक्षक आणि समिक्षकांचा भरभरून मिळणारा प्रतिसाद आणि प्रेम पाहून मन आनंदाने भरून आलं आहे. दगडीचाळ प्रमाणेच ‘दगडी चाळ 2’ ला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. कष्टाचा चीज झाल्याच वाटत आहे. इतक्या कमी वेळात मिळालेल्या उत्तुंग यशानंतर मी निःशब्द झाले आहे. सर्व माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाला खूप खूप धन्यवाद असेच प्रेम कायम करीत राहाल अशी आशा आहे .”


हेही वाचा :राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत शेखर सुमनने दिली माहिती; ट्वीट शेअर करत म्हणाला महादेवाची कृपा…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -