घरताज्या घडामोडीकोण ती मागच्या सरकारमधील वरुण सरदेसाई नावाची व्यक्ती?, नितेश राणेंची नाव न...

कोण ती मागच्या सरकारमधील वरुण सरदेसाई नावाची व्यक्ती?, नितेश राणेंची नाव न घेता ठाकरेंवर टीका

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवशनात महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक मांडले. या विधेयकाला विरोधकांनी विरोध केला. विरोधी पक्ष नते अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी विरोध केला.

‘कोण तो मागच्या सरकारमधील वरुण सरदेसाई नावाचा व्यक्ती?, त्याला इतकी सुरक्षा का देण्यात आली?, नगरविकास खात्याच्या मिटींग वरूण सरदेसाई का घ्यायचे?, त्यांना तुम्ही निर्णय घ्यायला दिले नाही आणि आता त्यांच्यावरच आरोप करतात की तुम्ही तुमचे का निर्णय बदलतात’, अशा शब्दांत भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी विरोधकांवर विधानसभेत निशाणा साधला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवशनात महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक मांडले. या विधेयकाला विरोधकांनी विरोध केला. विरोधी पक्ष नते अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी विरोध केला. त्यावर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी प्रत्यत्तर देत विरोधकांवर हल्लाबोल केला. तसेच, महाविकास आघाडी सरकारवरही निशाणा साधला. (BJP MLA nitesh rane slams yuva sena leader varun sardesai in monsoon session 2022)

“मुख्यमंत्री विधेयक मांडत असताना त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे का?, त्यांचे निर्णय कसे बदलतात?, हे सर्व विषय विधेयकाच्या सुरूवातीलाच उल्लेख करण्यात आले. कमी बोलणे आणि जास्त काम करणे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उभ्या महाराष्ट्राला ओळख आहे. गेल्या सरकारमध्ये नगरविकास खात्यासाठी काम करत असताना त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्या मिळत होते का, या मुद्द्यांवरही चर्चा करायला हवी. त्यांना त्यांचेच निर्णय का बदलायला लागत होते. त्यांना ते निर्णय घेण्यासाठी कोण प्रवृत्त करत होतं. सरकारमधील बाहेरचे लोकल त्यांना कसे निर्णय घ्यायला लावत होते. याचीही चर्चा करायला हवी. मागील सरकारमध्ये जे मंत्री होत त्यांना का राजीनामा द्यावा लागला, मुख्यमंत्र्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला. यामगेही काहीतरी कारणे आहेत”, असे भाजपा आमदार नितेश राणे यांनी म्हटले.

- Advertisement -

“या अधिवेशनात महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयकाला विरोध करत काही ज्येष्ठ नेत्यांनी एका निर्णयावर टाम राहायला हवे असे म्हटले होते. मला वाटते ते एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी एक मतावर ठाम होते. त्यामुळे त्यांनी बाहेर पडत हिंदूत्ववादी सरकार स्थापन करून राज्यात परत आले आहेत. हाच तर त्यांचा विचार होता. नगरविकास खाते त्यांच्या मर्जीप्रमाणे त्यांना चालवायला द्यायचे का, कोणतही वांद्रे कलानगरच्या वैभव चेंबर्समध्ये बसून निर्णय घ्यायचा. त्यानंतर तिथून फाईली यायची आणि एकनाथ शिंदेंवर सही करण्यासाठी दबाव असायचा”, असे राणे यांनी म्हटले.

“कोण तो मागच्या सरकारमधील वरुण सरदेसाई नावाचा व्यक्ती?, त्याला इतकी सुरक्षा का देण्यात आली?, नगरविकास खात्याच्या मिटींग वरूण सरदेसाई का घ्यायचे?, त्यांना तुम्ही निर्णय घ्यायला दिले नाही आणि आता त्यांच्यावरच आरोप करतात की तुम्ही तुमचे का निर्णय बदलतात. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा एक शिवसैनिक त्याला असा का निर्णय घ्यावा लागतो, याबाबत शिवसेनेच्या या नेत्यांनी विचार करायला हवा” असेही राणे यांनी म्हटले.

- Advertisement -

“रक्त सांडून आणि घाम गाळून उभी केलेली शिवसेना आहे. हे वरूण सरदेसाईसारखे कोणतरी येणार आणि या ज्येष्ठ लोकांना निर्णय घ्यायला लावायचे, हा कोणता कायदा आहे”, असे भाजपा आमदार नितेश राणे यांनी म्हटले.


हेही वाचा – ‘…तो सरकारचा निर्णय असतो’; थेट नगराध्यक्ष निवडणूक विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -