घरमनोरंजनदीपिकाच्या अडचणीत वाढ; माहिती आणि प्रसारण मंत्रालयामध्ये तक्रार दाखल

दीपिकाच्या अडचणीत वाढ; माहिती आणि प्रसारण मंत्रालयामध्ये तक्रार दाखल

Subscribe

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट येत्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट महिन्याभरापासून चर्चेत आहेत. परंतु ‘पठाण’ हा चित्रपट मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. शिवाय या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या चित्रपटामुळे सामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकजण आपली प्रतिक्रिया मांडू लागले आहेत. दरम्यान, आता समोर आलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीने दीपिकाविरोधात माहिती आणि प्रसारण मंत्रायलयामध्ये तक्रार दाखले केली आहे.

दीपिकाच्या अडचणीत वाढ
माडिया रिपोर्ट्सनुसार, विनीत जिंदल नावाच्या एका व्यक्तीने दीपिकाच्या कपड्यांच्या रंगाविरुद्ध सूचना आणि प्रसारण मंत्रायलयामध्ये तक्रार दाखल केली आहे. विनीत जिंदलच्या मते, आपल्या हिंदू धर्मामध्ये साधू भगवा रंग परिधान करतात. ज्याप्रकारे या गाण्यामध्ये या रंगाचा वापर करण्यात आला आहे ते चूकीचं आहे. दरम्यान, याआधी देखील मध्यप्रदेशमधील गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दीपिकाच्या बिकनीवर प्रतिक्रिया संताप व्यक्त केला होता. त्यांनी देखील या रंगावर प्रश्न उपस्थित केले शिवाय गाण्यातील तो सीन बदलण्याची मागणी केली होती.

- Advertisement -

25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार चित्रपट
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.

 

- Advertisement -

हेही वाचा :

हे गाणं सेंसॉर बोर्डाने कसं पास केलं… मुकेश खन्नांचा ‘पठाण’ वर निशाणा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -