घरमनोरंजनकाळाराम मंदिचा ऐतिहासिक सत्याग्रह उलघडणार

काळाराम मंदिचा ऐतिहासिक सत्याग्रह उलघडणार

Subscribe

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत काळाराम मंदिचा ऐतिहासिक सत्याग्रह उलघडणार आहे.

भारताच्या घटनेचे शिल्पकार आणि लोकशाहीचे त्राते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र हे इतिहासातले एक महान पर्व असून इतिहासाचे हे सोनेरी पान पुन्हा एकदा उलघडणार आहे. ‘स्टार प्रवाह’वर सुरु असलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेत काळाराम मंदिचा ऐतिहासिक सत्याग्रह उलघडणार आहे. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाची ही क्रांतिकारक घटना या मालिकेतून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. हा ऐतिहासिक प्रसंग जिवंत करण्यासाठी सध्या मालिकेचे सर्वच कलाकार दिवसरात्र राबत आहेत. मालिकेतील मुख्य कलाकारांसोबत जवळपास १५० हून अधिक कलाकारांचा ताफा या खास चित्रिकरणासाठी बोलावण्यात आला आहे. विशेष म्हणजे रिअल लोकेशन्स आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून काळाराम मंदिराची हुबेहुब प्रतिकृती तयार करण्यात आली असून तो काळ जिवंत करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेची टीम करत आहे.

काय असणार हा ऐतिहासिक सत्याग्रह

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे अभूतपूर्व स्थान असून हा लढा २ मार्च १९३० ला सुरू झाला होता. तसेच हा लढा पुढे पाच वर्ष चालला होता. तसेच या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाची फक्त सनातनी हिंदूंनाच जागे करण्यासाठी नव्हे तर त्यावेळच्या सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि दलितांना, शोषितांना त्यांचे मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली असे म्हटले जाते आणि हाच ऐतिहासिक सत्याग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेत दाखवला जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा  – नेहा कक्कडची लगीन घाई, अखेर मुहूर्त ठरला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -