घरमनोरंजनDrugs Case: राकुल प्रीत सिंह, रवी तेजा,राणा दग्गुबतीवर ईडीची टांगती तलवार

Drugs Case: राकुल प्रीत सिंह, रवी तेजा,राणा दग्गुबतीवर ईडीची टांगती तलवार

Subscribe

सुशांत सिंह राजपूतशी संबंधित ड्रग्स प्रकरणामध्ये देखील रकुल प्रीत सिंहचीही चौकशी करण्यात आली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चार वर्ष जुन्या ड्रग्स प्रकरणामध्ये टॉलिवूड आणि बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय दिग्दर्शक तसेच कलाकारांना समन्स पाठवला आहे.यामध्ये राकुल प्रीत सिंह,राणा दग्गुबाती,रवि तेजा, पुरी जगन्नाख यांचा समावेश आहे. यासोबतच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकारांची नावे देखील ईडीच्या यादित समाविष्ट आहेत अशी माहिती समोर येत आहे.(ED has summoned rakul preet singh and rana daggubati in drug case)

सर्व कलाकारांना वेगवेगळ्या तारखेनुसार ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रकुल प्रीत सिंह 6 सप्टेंबर, राणा दग्गुबाती 8 सप्टेंबर, रवि तेजा 9 संप्टेंबर, पुरी जगन्नाथ (दिग्दर्शक) 31 सप्टेंबर या तारखे प्रमाणे वेळेत ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहा असा समन्स बजावण्यात आला आहे. तेलंगणा उत्पादन शुल्क विभागाने 2017मध्ये 30 लाख रुपयांचे आंमली पदार्थ जप्त केले होते. यानंतर त्यांनी तब्बल 12गुन्हे दाखल केले होते. यापैकी 11 प्रकरणामध्ये आंमली पदार्थ तस्करांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

- Advertisement -

उत्पादन शुल्क विभागाच्या प्रकरणा अंतर्गत ईडीने गुन्हा दाखल केला होता. अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी संबंधित ड्रग्स प्रकरणामध्ये देखील रकुल प्रीत सिंहचीही चौकशी करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati)

- Advertisement -


हे हि वाचा – अक्षयच्या 300 कोटी बिग बजेट ‘सूर्यवंशी’ सिनेमाला ओटीटीवर मिळाली फक्त 50 कोटींची ऑफर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -