घरमनोरंजनGauri Khan : शाहरुखच्या घरापर्यंत पोहचली ED, 30 कोटींच्या घोटाळ्यात गौरी खान...

Gauri Khan : शाहरुखच्या घरापर्यंत पोहचली ED, 30 कोटींच्या घोटाळ्यात गौरी खान आरोपी

Subscribe

Gauri Khan : शाहरूख खान यांच्या पत्नी गौरी खान यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. गौरी खान यांना ईटी नोटीस पाठावली आहे. गौरी खान तुलसियानी ग्रुमच्या ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. या कंपनीवर फसवणुकीचा आरोप आहे. गौरी खान लखनऊ मधील रिअर इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. या कंपनीवर गुंतवणूकदार आणि बँकांचे अंदाजे 30 कोटी रूपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. त्यामुळे याप्रकणात गौरी खानची चौकशी ईडी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

मिळाल्या माहितीनुसार गौरी खान यांनी देखील पैशांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. गौरी खानला नोटीस बजावण्यासाठी ED च्या मुख्यालयाची परवानगी घेण्याची तयारी सध्या सुरू आहे. परवानगी मिळाल्यानंतर ईडी गौरी खानची चौकशी होणार अशी माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

तुलसियानी ग्रुपने गौरीला ब्रँड ॲम्बेसेडर होण्यासाठी किती पैसे दिले आणि ठरवण्यात आलेली रक्कम कशी देण्यात आली. यांसारख्या अनेक गोष्टींची चौकशी ED च्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येतील. कंपनीच्या ब्रँड ॲम्बेसेडरसाठी कोणते करार झाले. या कराराची कागदपत्रेही ED गौरी खानकडून घेतली जाणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

लखनऊ मधील सुशांत गोल्फ सिटी भागातील तुलसियानी गोल्फ व्ह्यूमध्ये असलेल्या फ्लॅटची किंमत आपण भरल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला होता. हा फ्लॅट त्यांनी दुसऱ्याला दिला होता. या प्रकरणी गौरीशिवाय जसवंत शाह यांनी तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार तुलसियानी आणि संचालक महेश तुलसियानी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. ब्रँड अॅम्बेसेडर गौरी खान यांच्या प्रभावाखाली राहून त्यांनी फ्लॅट खरेदी केल्याचे फिर्यादीत म्हटले होते.

- Advertisement -

कंपनीच्या खात्यात 85.46 लाख रुपये जमा केल्याचे जसवंत शहा यांनी तक्रारीत म्हटले होते. पैसे देऊनही त्यांना ताबा देण्यात आला नाही असा आरोप केला होता. त्यांनी बुक केलेला फ्लॅट दुसऱ्याला विकल्याचे तपासात उघड झाले आहे. यानंतर त्यांनी गौरी खानसह तिघांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -