घरमनोरंजनचित्रपटसृष्टीकडे चांगल्या स्क्रिप्टची कमतरता - कबीर खान

चित्रपटसृष्टीकडे चांगल्या स्क्रिप्टची कमतरता – कबीर खान

Subscribe

दिग्दर्शक कबीर खान याने हिंदी सिनेसृष्टीकडे चांगले पटकथाकार नसल्यामुळे सिनेमांना दर्जेदार स्क्रिप्ट लाभत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

फिल्ममेकर कबीर खान याने हिंदी सिनेसृष्टीकडे चांगले पटकथाकार नसल्यामुळे सिनेमांसाठी दर्जेदार स्क्रिप्ट लाभत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे बॉलीवूडला त्याचा फटका बसत असल्याचे त्याने म्हटले आहे. दिग्दर्शक कबीर खान याने २०१५ साली हुसेन झैदी यांच्या ‘मुंबई अॅव्हेंजर्स’ या पुस्तकावर आधारीत ‘फॅंटम’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होते. पंरतू, सिनेसृष्टी खुप कमी सिनेमे पुस्तकांवर किंवा चांगल्या कथेवर आधारीत बनवले जातात, असे कबीरने नमूद केले आहे.

हॉलीवूडला दहा पटकथांचा पर्याय 

कबीर खान याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ही खंत व्यक्त केली आहे. आपण अजूनही आपल्याकडे असलेल्या पटकथा लेखकांच्या स्क्रिप्टवर अवलंबून आहोत. अजूनही मोठ्या पडद्यावर दाखवण्यासारख्या दर्जेदार स्क्रिप्ट आणि संहितेची कमतरता आपल्या इंडस्ट्रीकडे आहे. हॉलीवूडमध्ये अजूनही दिग्दर्शकांना किमान दहा स्क्रिप्टमधून कोणत्या कथेवर चित्रपच बनवायचा याचा पर्याय उपलब्ध असतो. त्यापैकी एक निवडून त्यावर आधारीत ते वर्षातून एक चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येतात. इथे आम्हाला एक अशी संहिता मिळताना कठिण होते, ज्यावर चित्रपट बनवण्यासाठी आम्ही उत्सुक होऊ, असे कबीर खान याने म्हटले आहे.

- Advertisement -

इतिहासाची मदत घ्यावी 

सिनेसृष्टीतील निर्माते, चित्रपटकर्मी आपल्या देशातील इतिहासाकडे अजूनही लक्ष देत नाहीत. याची खंत वाटते. भारताला इतका दर्जेदार आणि प्रभावित करणारा इतिहास आहे, की त्यातील कित्येक विषयांवर सिनेमे बनू शकतात. मात्र असे विषय निवडले जात नाहीत. त्याची सुरुवात होणे गरजेचे आहे. कबीर खान याने ‘बजरंगी भाईजान’, ‘फॅंटम’, ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘ट्युबलाईट’ सारखे चित्रपट दिग्दर्शीत केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -