घरदेश-विदेशज्योतिरादित्य सिंधियांना गोळी मारण्याची धमकी देणारा भाजप आमदार पुत्र अटकेत

ज्योतिरादित्य सिंधियांना गोळी मारण्याची धमकी देणारा भाजप आमदार पुत्र अटकेत

Subscribe

काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांना हटा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार पुत्राने गोळी मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आता त्याला अटक करण्यात आली आहे.

भाजप आमदार उमादेवी खटीक यांचा मुलगा प्रिंसदिप लालचंद खटिक यांने काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांना फेसबुकवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती. वीस वर्षीय प्रिंसदीपला आता पोलिसांनी अटक केली आहे. मध्य प्रदेश राज्यात यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. राज्यात निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले नसले तरी राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. कालच मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्या ‘जन आशीर्वाद यात्रेवर दगडफेक करण्यात आली होती. ज्यामध्ये काही काँगेसच्या लोकांना अटक करण्यात आली होती. आता सिंधिया यांना धमकी देणाऱ्या भाजप पुत्राची अटक करण्यात आली आहे.

काय होती फेसबुक पोस्ट

मध्य प्रदेशच्या हटा विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार उमादेवी यांचे पुत्र प्रिंसदिप खटिक याने फेसबुकवर पोस्ट टाकून ही धमकी दिली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, “ऐक ज्योतिरादित्य तुझ्या धमन्यामध्ये जीवाजी रावचे रक्त वाहत आहे. जीवाजीरावने बुंदेलखंडची मुलगी झांशीच्या राणीचा खून केला होता. जर उपकाशी हटा (मतदारसंघात) प्रवेश करून या भूमीला अपवित्र करण्याचा प्रयत्न करशील तर मी गोळी मारेन. एक तर तू राहशील नाहीतर मी.” यावर प्रतिक्रिया देताना आमदार उमादेवी यांनी मात्र जबाबदारी झटकली आहे. आपल्या मुलाने लिहिलेली पोस्ट दुर्दैवी असून ज्योतिरादित्य खासदार आहेत, त्यांच्यावर अशाप्रकारची टीका करणे योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या आहेत.

- Advertisement -

दुसऱ्या बाजुला काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एएनआयला प्रतिक्रिया देताना सांगितले की, या पोस्टच्या निमित्ताने भाजपच्या नेत्यांची विचारसरणी आणि त्यांचा खरा चेहरा उघडा पडला आहे. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला संपवून टाकायचे असा उद्देश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांचा आहे. मी सांगू इच्छितो की, सिंधिया कुटुंब आणि मी असल्या धमक्यांना कधीच भीक घालत नाही.

- Advertisement -

दरम्यान प्रिंसदीपने ही पोस्ट फेसबुकवरून डिलीट केली आहे. ५ सप्टेंबर रोजी हटा जिल्ह्यात ज्योतिरादित्य सिंधिया यांची जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार पुत्राने ही पोस्ट फेसुबकवर टाकली होती.

Princedip Khatik Facebook Post
हीच ती डिलीट केलेली पोस्ट
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -