घरमनोरंजनGashmeer Mahajani : 'साऊथसारखी मराठी इंडस्ट्री...' अभिनेता गश्मीर महाजनी स्पष्टच बोलला

Gashmeer Mahajani : ‘साऊथसारखी मराठी इंडस्ट्री…’ अभिनेता गश्मीर महाजनी स्पष्टच बोलला

Subscribe

लोकप्रिय मराठी अभिनेता गश्मीर महाजनी हा त्याच्या अप्रतिम अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखला जातो. मराठी कलाविश्वातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणून गश्मीर याला चाहत्यांकडून प्रेम मिळतं. गश्मीर फक्त त्याचे सिनेमे आणि डान्समुळे नाहीतर, सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेता चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. गश्मीरने आता चाहत्याच्या एका प्रश्नाला उत्तर देताना मराठी सिनेसृष्टीविषयी भाष्य केलं आहे.

गश्मीरने इन्स्टाग्रामवर ‘आस्क गॅश’ सेशन ठेवलं होतं. त्या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तर दिलं. एका चाहत्याने गश्मीरला विचारलं, ‘मराठी इंडस्ट्री साऊथसारखी प्रगती करु शकते का?’ असा प्रश्न विचारला.. यावर अभिनेत्याने दिलेल्या उत्तराने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या सर्वत्र गश्मीर आणि चाहत्यांमध्ये रंगलेल्या प्रश्न – उत्तरांच्या खेळाची चर्चा रंगत आहे. या प्रश्नावर गश्मीर उत्तर देत म्हणाला, “नक्कीच. आपल्याकडे आपणच आपलं कौतुक करतो आणि आपणच आपले पाय ओढतो. हा पॅटर्न तोडला पाहिजे.” याआधी देखील गश्मीर याने त्याला खटकत असलेल्या गोष्ट स्पष्टपणे सांगितल्या आहे. चाहत्यांमध्ये अभिनेता कायम चर्चेत असतो.

- Advertisement -

Gashmir Mahajani

‘सरसेनापती हंबीरराव’, ‘देऊळ बंद’, ‘विशू’, ‘डोंगरी का राजा’ असे अनेक सिनेमे आणि मालिकांच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेत्याच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत चाहते असतात. सोशल मीडियावर अभिनेत्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. गश्मीर त्याचाा डान्स व्हिडीओमुळे देखील चर्चेत असतो. गश्मीरने ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची घोषणा केली होती. चाहते गश्मीरच्या आगामी चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -