घरमनोरंजनGayatri Joshi : शाहरुखच्या चित्रपटातील अभिनेत्रीचा इटलीमध्ये भीषण कार अपघात

Gayatri Joshi : शाहरुखच्या चित्रपटातील अभिनेत्रीचा इटलीमध्ये भीषण कार अपघात

Subscribe

Gayatri Joshi : शाहरुख खान स्टारर स्वदेश (Swadesh) चित्रपटातील सहकलाकार अभिनेत्री गायत्री जोशी (Gayatri Joshi) आणि तिचा पती विकास ओबेरॉय यांचा भीषण अपघात झाला असून दोघेही जखमी झाले आहेत. मात्र या अपघातात फेरारी कारमधील वृद्ध स्विस जोडप्याचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये (Italy) झालेल्या या भीषण अपघाताचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Gayatri Joshi Shahrukh khan film actress met with a horrific car accident in Italy)

हेही वाचा – अनवाणी येऊन राम चरणने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

- Advertisement -

भीषण अपघात इटलीच्या सार्डिनिया भागात घडल्याचे समोर आलं आहे. या अपघातात गायत्री जोशी आणि तिचा पती विवेक ओबेरॉय कार अपघातातून सुदैवाने बचावले आहेत. दोघेही सुट्टीनिमित्त इटली दौऱ्यावर आहेत. गायत्री आणि तिचा पती लॅम्बोर्गिनी चालवत असताना फेरारी कारने आधी अभिनेत्री गायत्री जोशीच्या निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी कारला धडक दिली आणि त्यानंतर कॅम्पर ट्रकला जोरदार धडक दिली. यावेळी कॅम्पर ट्रक हवेत उडाला असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या अपघातात 63 वर्षीय मेलिसा क्रॉटली आणि 67 वर्षीय मार्कस क्रॉटली यांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. हे  दोघे स्वित्झर्लंडचे रहिवासी होते.

- Advertisement -

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हा अपघात व्हायच्या आधी मिनी ट्रकच्या मागे एकामागून एक आलिशान कार वेगाने जाताना दिसत आहेत. गायत्रीही तिच्या पतीसोबत लॅम्बोर्गिनीमध्ये जात असताना त्यांच्या मागे काही आलिशान गाड्या एकमेकांच्या मागून वेगाने जात होत्या. मात्र अचानक ओव्हरटेक करताना, फेरारी कार लॅम्बोर्गिनीला धडकली आणि त्यानंतर पुढे  असलेल्या कॅम्पर ट्रक धडल्यानंतर ट्रक हवेत उडाला. कॅम्पर ट्रक हवेत उलटल्यानंतर फेरारी कारला आग लागली, त्यामुळे त्या कारमध्ये बसलेल्या स्विस जोडप्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, स्थानिक वृत्तावाहिनीशी बोलताना गायत्री जोशी म्हणाली की, विकास आणि मी इटलीमध्ये आहोत, इथे आमचा अपघात झाला पण देवाच्या कृपेने आम्ही पूर्णपणे ठीक आहोत.

हेही वाचा – प्रेग्नेंसीच्या बातम्यांदरम्यान अनुष्काची पोस्ट चर्चेत

शाहरुखसोबत ‘स्वदेश’ चित्रपटात केले आहे काम

गायत्री जोशीने 2004 मध्ये शाहरुख खानच्या ‘स्वदेस’ या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये प्रवेश केला होता. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. मात्र, यानंतर तिने स्वत:ला अभिनयापासून दूर केले आणि ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापकीय संचालक विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -