घरमनोरंजन‘हसताय ना? हसायलाच पाहिजे! ’शूटिंगचा BTS व्हिडीओ रिलीज

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे! ’शूटिंगचा BTS व्हिडीओ रिलीज

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून मराठमोळा अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे हा खूप चर्चेत होता. संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसायला भाग पाडणारा दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे हा त्याचा नवीन शो ‘हसताय ना ? हसायलाच पाहिजे’ कलर्स मराठीवर घेऊन आला आहे. कार्यक्रमाचा नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताच या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच ताणून धरली होती. शोचे प्रोमो, टिझर आणि शीर्षक गीत रिलिज झाल्यापासून सोशल मीडियावर चांगलीच याबद्दल चर्चा सुरू होती.

नुकतच या शोच्या प्रोमोचा बीटीएस व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. रसिकांनी या व्हिडीओला खूप चांगला प्रतिसाद दिला असून कंमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. हा प्रोमो शूट करतानाची मज्जा, मस्ती आणि धमाल तुम्ही यात पाहू शकता. हा व्हिडीओ तुम्हाला पोट धरून हसायला भाग पाडेल. या व्हिडीओत तुम्ही निलेश साबळे , भाऊ कदम, ओंकार भोजने आणि सुपर्णा श्याम यांना पाहू शकता. त्याचबरोबर कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे देखील या प्रोमो शूटच्या वेळी हजर होते.

- Advertisement -

‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. ओंकार भोजने व भाऊ कदम यांच्या विनोदावर ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची संपूर्ण टीम पोट धरून हसत होती. या सोबत अभिनेते भरत जाधव व अलका कुबल या देखील ओंकार व भाऊ यांच्या विनोदावर हसत होते.

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या शोचे लेखन, दिग्दर्शन डॉ. निलेश साबळे यांनी केले. तर भाऊ कदम, ओंकार भोजने या विनोदवीर सोबत सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदी कलाकारांचा देखील समावेश आहे.

- Advertisement -

________________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -