घरमनोरंजननेहा कक्कडच्या गाण्यावर चिमुरडीची पावलं थिरकली; व्हिडिओ होतोय व्हायरल

नेहा कक्कडच्या गाण्यावर चिमुरडीची पावलं थिरकली; व्हिडिओ होतोय व्हायरल

Subscribe

या व्हिडिओला एक लाखांहून अधिक लोकांची पसंती

बॉलिवूडची गायक नेहा कक्कडच्या आवाजाने तिने संगीत क्षेत्रात आपले वर्चस्व तर दाखवले पण असंख्य चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. रिअॅलिटी शोची परिक्षक म्हणून असणाऱ्या नेहाने अनेक चित्रपटांची गाणी देखील गायले आहे. एवढेच नाही तर नेहाला आजही लाईव्ह स्टेज शो करणे तेवढेच आवडते.

नुकतेच इंडोनेशियातील बाली येथे नेहाला एका लग्न सोहळ्याकरिता आमंत्रित करण्यात आले होते. नेहा आपल्या गाण्याचे सादरीकरण करण्यासाठी बाली येथे गेली होती. यावेळी नेहाला गाणे सादर करताना एक लहान चाहती मिळाली.

- Advertisement -

या लग्न सोहळ्यात नेहा कक्कड तिच्या सह कलाकार गायकांसोबत ‘बोलो ता रा रा’, ‘तारे गिन-गिन याद में तेरी’ या गाण्यांवर आपल्या सह गायकांसोबत गाणे सादर करत होती. यावेळी एक इंडोनेशियन चिमुकली नेहाच्या गाण्यावर डान्स करू लागली. त्या ठिकाणी उपस्थितीत असणाऱ्या लोकांनी त्या लहान मुलीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हि़डिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर आतापर्यंत हा व्हिडिओ एक लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -