घरमनोरंजन'पान सिंग तोमर' ते 'लंचबॉक्स'पर्यंत इरफान यांचा प्रवास; 'या' आहेत अविस्मरणीय व्यक्तिरेखा

‘पान सिंग तोमर’ ते ‘लंचबॉक्स’पर्यंत इरफान यांचा प्रवास; ‘या’ आहेत अविस्मरणीय व्यक्तिरेखा

Subscribe

इरफान खान यांनी बऱ्याच अविस्मरणीय व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यापैकी काही...

वयाच्या 53 व्या वर्षी इरफान खान यांचे निधन झाले आहे. इरफान खान गेल्या दोन वर्षांपासून आजाराशी झुंज देत असून आज त्यांनी आपल्या लाडक्या चाहत्यांना निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. इरफान खान अशा बॉलिवूड स्टारपैकी एक आहे ज्यांनी आपल्या अभिनयाने जगभरात ठसा उमटविला. तसेच भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नेण्यासही आपले योगदान दिले. अलीकडेच त्यांचा ‘इंग्लिश मीडियम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दरम्यान इरफान खान यांनी बऱ्याच अविस्मरणीय व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यापैकी काही…

द वॉरियर (2001):

इरफान खान यांच्या या चित्रपटाची कथा ब्रिटिश भारतीय सरंजामशाही राजस्थानच्या योद्धाविषयी आहे. या चित्रपटामधील त्यांचा लूक सर्वाधिक चर्चेत होता.

- Advertisement -

पान सिंग तोमर (2012):

पनसिंग तोमर हा हिंदी चित्रपट सैन्याच्या भारतीय राष्ट्रीय खेळातील सुवर्णपदक विजेता पानसिंग तोमरच्या खर्‍या कथेवर आधारित आहे, या चित्रपटातील इरफान खान यांच्या अभिनयाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

- Advertisement -

किस्सा (2013):

किस्सा या हिंदी चित्रपट इरफान खान यांनी व्यक्तीरेखा साकारली असून या चित्रपटाची कहाणी अगदी हृदयस्पर्शी आहे. या चित्रपटात साकारलेली व्यक्तिरेखा अशी आहे की, ज्याला आपला वंशानुसार पुढे न्यायचा असतो, यासाठी तो व्यक्ती काहीही करण्यास तयार असतो.

लंच बॉक्स (2013):

या चित्रपटात इरफान खान यांनी वेगळीच भावनिक व्यक्तिरेखा साकारली होती. ज्यात पत्नीचे निधन झालेले असते मात्र तरी देखील त्यांना त्यांच्या पत्नीवर अनोखं प्रेम होते.

तलवार (2015):

2015 साली आलेल्या तलवार या चित्रपटात
इरफान खान यांनी सीबीआय अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा उत्तम पद्धतीने साकारली होती, त्यामुळे आजही चाहत्यांच्या मनात ही व्यक्तिरेखा घर करून आहे.


#RIPIrfan: ना ते घेऊ शकले आईचं शेवटचं दर्शन, ना पूर्ण करू शकले तिची शेवटची इच्छा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -