घरमनोरंजन'दुसऱ्यांना शिकवतेस स्वतः काय करतेस?' कंगनाच्या बोल्ड फोटोंवर नेटकऱ्यांचा संताप

‘दुसऱ्यांना शिकवतेस स्वतः काय करतेस?’ कंगनाच्या बोल्ड फोटोंवर नेटकऱ्यांचा संताप

Subscribe

बॉलिवूडची धाकड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. दरम्यान कोणत्याही राजकीय तसेच सामाजिक मुद्द्यांवर कंगना तिचे रोखठोक मत व्यक्त करते.  त्यामुळे कंगना अनेकदा वादाचे कारण ठरते. सोशल मीडियावरही कंगना बरीच अॅक्टिव्ह असते. नवनवीन फोटो, व्हिडिओ ती चाहत्यांसाठी पोस्ट करते. कंगना सध्या ट्विटरवर जोरदार ट्रेंड होते. मात्र यामागचे तिचे कारण तिचे वादग्रस्त वक्तव्य नसून तिचा फोटो आहे. या फोटोंवरून सध्या नेटकऱ्यांकडून कंगनाला बरचं ट्रोल केलं जातयं. या फोटोंमध्ये कंगना अधिक बोल्ड अंदाज दिसून येतेय.

समुद्र किनारी सूर्यास्ताचा आनंद घेत कंगना फोटोंमध्ये पोझ देत आहे. या फोटोसह कॅप्शनमध्ये तिने ‘मोहब्बत मे नही है फरक जीने और मरने का, उसी को देख कर जीते है जिस काफिर पे दम निकले’,अशी शायरी लिहिली आहे. यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा ब्रालेट आणि पँटवर  गोल्डन चेन परिधान करत बन बांधला आहे. या फोटोमध्ये कंगना अधिकच बोल्ड वाटतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

- Advertisement -

बऱ्याच वर्षांनंतर कंगनाचा असा लूक पाहण्याची चाहत्यांनी संधी मिळाली. मात्र तिच्या नव्या लूकमधील फोटोंवरुन आता सोशल मीडियावर आता कमेंटस, लाईक्सचा पूर आलाय. काहींना तिच्या लूकला पसंती दर्शवली तर काहींनी टीका केलीय. यावर एक युजर्सने ‘इतरांना शिकवण देत असतेस, मात्र स्वत: बोल्ड लूकमध्ये फोटोशूट करतेस,’ अशी कमेंट लिहिली आहे. तर दुसऱ्य़ा एका युजर्सने ‘तुझ्या सभ्य सनातन महिलेच्या इमेजला धक्का देणारा हा लूक आहे, ‘ अशी कमेंट केलीय. कंगनाच्या वर्कफ्रिंटबद्दल सांगायचे झाल्यास, तिचा धाकड हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकतीच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -