घरमनोरंजनकपिल शर्माची लग्नपत्रिका व्हायरल

कपिल शर्माची लग्नपत्रिका व्हायरल

Subscribe

याचवर्षी १२ डिसेंबरला जालंधरमध्ये कपिल आणि गिन्नी लग्नबंधनात अडकणार असल्याचं कपिलनं जाहीर केलं आहे. कपिल शर्माची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याने स्वत: आपल्या लग्नपत्रिकेचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकले आहेत.

कॉमेडियन कपिल शर्माची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याने स्वत: आपल्या लग्नपत्रिकेचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकले आहेत. बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वातावरण आहे. दीपिका-रणवीरच्या लग्नानंतर प्रियंका आणि निक जोनस यांच्या लग्नाच्या चर्चांना उधान आले होते. त्यानंतर आता कपिल शर्माच्याही लग्नाच्या चर्चा होत आहेत. याचवर्षी १२ डिसेंबरला जालंधरमध्ये कपिल आणि गिन्नी लग्नबंधनात अडकणार असल्याचं कपिलनं जाहीर केलं आहे.

 

View this post on Instagram

 

#kapilginni #kapilsharma #kapilwedsginni

A post shared by Aniket Saha @K.S (@kapil_is_my_life_aniket) on

 हेही वाचा – कॉमेडियन कपिल शर्माही चढणार बोहल्यावर

- Advertisement -

‘अशी’ आहे कपिलची लग्नपत्रिका

कपिलची लग्नपत्रिका एकदम साधी आहे. कपिलने इन्स्टाग्रामवर टाकलेल्या पोस्टमध्ये लग्नपत्रिकेसोबत मिठाईचे बॉक्स देखील दिसत आहे. कपिल-गिन्नीचे लग्न जालंधरमध्ये होणार आहे.

 

View this post on Instagram

 

Need ur blessings ??

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

- Advertisement -

कोण आहे गिन्नी?

कपिल आणि गिन्नीचा भेट कॉलेजमध्ये झाली होती. कपिल जेव्हा हंस बलिये नावाच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता, तेव्हा त्यांच्यातील संबंध जास्त जवळ आले होते. गिन्नी जालंधरची आहे. गिन्नीने शिक्षणात एमबीएची पदवी मिळवली आहे. सध्या ती आपल्या वडिलांच्या व्यवसायात त्यांना मदत करत आहे.


हेही वाचा – बायकोला आनंदी कसं ठेवू? कपिलचा बिग बिंना प्रश्न

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -