घरमहाराष्ट्रनिवडणुकीच्या आधीच धुळ्यात ५०० गुंड तडीपार

निवडणुकीच्या आधीच धुळ्यात ५०० गुंड तडीपार

Subscribe

महानगर पालिकेची निवडणूक निर्भयपणे आणि पारदर्शपणे पार पडावी यादृष्टीने प्रशासनाने सर्व नियोजन पूर्ण केले आहे. प्रत्येक प्रभागातील उमेदवारावर कायदेशीर नियंत्रण ठेवण्यासाठी ५ हजार सरकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून येत्या ७ दिवसाच्या आत गुंड प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्यात येऊन त्यांना तडीपार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त जे.स.सहारिया यांनी दिली. आज महापालिक निवडणुकीच्या निमित्ताने धुळे दौर्‍यावर आलेल्या सहारिया यांची मनपा सभागृहात पत्रकार परिषद झाली.

यावेळी बोलतांना सहारिया यांनी सांगितले की, धुळे शहराची ४ लाख ४६ हजार ९४ ऐवढी लोकसंख्या असून मतदारांची संख्या ३ लाख २९ हजार आहे. यंदाच्या मनपा निवडणुकीत १९ प्रभागातून ७४ सदस्य निवडवले जातील. सुमारे ३५५ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्याच्या प्रचारासह निवडणूक प्रक्रियेवर निवडुक आयोग पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाच्या सहाय्याने पूर्णपणे देखरेख ठेवून आहे. प्रत्येक उमेदवारांवर कायदेशीर नियंत्रण ठेवण्यासाठी ५ हजार सरकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

- Advertisement -

तसेच निवडणुकीत मतदारांना प्रलोभन देणे, पैसे, दारु आदींचे वाटप धमकावण्याच प्रकार याकडे लक्ष वेधले असता सहारियांनी स्पष्ट केले की, आम्ही कायदा सुव्यस्था राखवण्यावर विशेष भर दिला आहे. पोलीस प्रशासनाच्या मदतीने सुमारे ५०० गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येवून त्यांना तडीपार करण्याचे नियोजन आहे. तसेच तपासणीसाठी पथके तयार करण्यात आली आहे. अवैध दारु वाहतूक, साठवणूक यावर कारवाई केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -