घरमनोरंजनसारा - कार्तिकचा ब्रेकअप? वाचा काय झालं

सारा – कार्तिकचा ब्रेकअप? वाचा काय झालं

Subscribe

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सारा अली खान आणि कार्तिक आर्यन या जोडीचा ब्रेकअप का झाला याचे कारण समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सारा अली खान आणि कार्तिक आर्यन या जोडीविषयी एक महत्वाची बाब समोर आली आहे. बर्‍याचदा एकत्र काम करताना कलाकार एकमेकांशी चांगले नातेसंबंध तयार करतात आणि हीच केमस्ट्री त्यांच्या सिनेमातही दिसते. इम्तियाज अलीच्या ‘लव आज कल’ या चित्रपटामधील तरुण जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचे चाहते आता उत्सुक आहेत. लव आज काल चित्रपटाचे प्रदर्शन जरी लांबले असले तरी बर्‍याचदा सारा आणि कार्तिक एकमेकांसोबत हँगआऊट करताना दिसले. त्यामुळे, त्या दोघांमध्ये काहीतरी असल्याची चर्चा सुरू झाली.

रिलेशनला फुलस्टॉप

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांनी इम्तियाज अलीच्या ‘लव आज कल’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. पण, या दोघांनी आता त्यांच्या रिलेशनला फुलस्टॉप लावला आहे. एका प्रोफेशनल कारणामुळे ते दोघे एकत्र येणार दिसणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शूटींगच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढणं आता दोघांनाही शक्य नाही. कार्तिकने ‘पती पत्नी और वो’चे शूटींगचे काम पूर्ण केलंय. त्यानंतर लगेचच तो दोस्ताना २ च्या शूटींगसाठी व्यस्त झाला आहे. तर, साराही कुली नंबर १ च्या रिमेकमध्ये व्यस्त आहे. या व्यस्त शेड्युलमध्ये वेळ काढून नातं टिकवण्यासाठी दोघांकडेही वेळ नाही आहे. त्यामुळे आता नात्यापेक्षा काम महत्त्वाचे आहे. हे नातं तोडण्यामागचा उद्देश असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

खरंतर, सारा आणि कार्तिक या दोघांनी ही आपल्या नात्याला कधीही लपवलं नाही. कार्तिक जेव्हा पती, पत्नी और वो च्या शूटींगमध्ये व्यस्त असताना सारा त्याला भेटायवा गेल्याचंही समोर आलं होतं. त्यानंतर कार्तिक ही साराच्या वाढदिवसासाठी बँकॉकला गेला होता. पण, आता त्यांनी त्यांच्या नात्याला थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी सारा आणि कार्तिकचा किसचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.


हेही वाचा – ओळखलत का? हिच ती झीरो फिगर सारा अली खान!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -