घरमनोरंजन'कसोटी जिंदगी..' ची अभिनेत्री घागरा न घालताच आली सेटवर; व्हिडिओ व्हायरल

‘कसोटी जिंदगी..’ ची अभिनेत्री घागरा न घालताच आली सेटवर; व्हिडिओ व्हायरल

Subscribe

एरिकाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच होतोय व्हायरल

एकता कपूरची प्रसिद्ध मालिका कसोटी जिंदगी की..मध्ये मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री एरिका फर्नांडिस टेलिव्हिजन विश्वातील सर्वात उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. एरिका तिच्या चाहत्यासह सेटवरचे अनेक मजेदार व्हिडिओ शेअर करत असते. अभिनेत्री एरिका फर्नांडिसचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्याचीच चर्चा होताना दिसतेय.

- Advertisement -

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये ती घागरा न घालताच मालिकेच्या सेटवर पोहोचलेली दिसत आहे. हा एक बिहाइंड द सीन्स व्हिडिओ असल्याने नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. हा व्हिडिओ स्वतः एरिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

- Advertisement -

असा आहे व्हायरल होणारा व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एरिका ट्रेडिशनल लूकमध्ये दिसतेय. मात्र या लहेंगा असणारा घागऱ्यात एरिका घागरा घालायला विसरुन गेल्याचे दिसतेय. या व्हिडीओमध्ये एरिका घागरा न घालता फक्त जीन्स घालूनच सेटवर पोहोचल्याचे त्या व्हिडिओमध्ये दिसतेय. त्यानंतर तिला दिग्दर्शकाने घागरा न घातल्याची आठवण करुन दिली. एरिकाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


बिग बॉसच्या घरात सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाईचा रोमान्स
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -