घरमनोरंजनछोटा भीम मोठ्या पडद्यावर

छोटा भीम मोठ्या पडद्यावर

Subscribe

स्पायडर मॅन, हि मॅन, सुपर मॅन हे सर्व तसे बच्चे मंडळींचे आवडते कॅरेक्टर. त्यांचे साहस, शत्रूवर आघात करण्याची पद्धत हे सारे काही अद्भूत असते जे लहान मुलांना मोहवून टाकते. आताच्या लहान मुलांना ही पात्रे आवडतातच, परंतु बुद्धीचातुर्य, बोलण्यात चलाखपणा आणि प्रत्येक ठिकाणी भीडस्तपणा अशाही व्यक्तीरेखा या बच्चेमंडळींना अधिक भावतात.

शिनचॅन, डोरेमॉन, पिकाचू यांच्याबरोबरीने या लहानग्यांना अधिक कोण आवडत असेल तर तो आहे छोटा भीम. अ‍ॅनिमेशन कार्टूनच्या माध्यमातून हा छोटा भीम घराघरात पोहोचलेला आहे. त्याचे चित्र असलेल्या अनेक वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. त्याची ही लोकप्रियता लक्षात घेऊन ग्रीन गोल्ड अ‍ॅनिमेशनने छोटा भीम कुं फू धकामा हा चित्रपट तयार केलेला आहे. या छोट्या भीमची बोलबच्चनगिरी यात असणार आहे. त्याहीपेक्षा त्याचे कर्तृत्त्व सिद्ध करणारे साहस थक्क करणारे असणार आहे. लाडीक गमतीशीर गाणी हे या चित्रपटाचे खास आकर्षण आहे. यातील गाण्यांची जबाबदारी सुनिधी चौहाण आणि दलेर मेहेंदी यांच्यावर सोपवलेली आहे.

- Advertisement -

सुनिधी स्वत: या छोट्या भीमची चाहती आहे, पण तिच्या मुलाला हा छोटा भीम आवडतो म्हटल्यानंतर तिने यातील गाणी त्याच भावूक मनाने गायलेली आहेत.सुनिल कौशिक, जॉन स्टीव्हर्ट इंदूरी यांनी या गाण्यांना संगीतबद्ध केलेले आहे. मुलांना शाळेला सुट्टी पडलेली आहे. हेच निमित्त घेऊन 10 मे ला हा चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी निर्मात्याने केलेली आहे. छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेला हा छोटा भीम मोठा पडदाही गाजवण्यासाठी सज्ज झालेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -