घरमनोरंजनManipur Violence : परिस्थिती आम्हा महिलांना.... मणिपूर घटनेवर बॉलिवूड अभिनेत्रींचा संताप

Manipur Violence : परिस्थिती आम्हा महिलांना…. मणिपूर घटनेवर बॉलिवूड अभिनेत्रींचा संताप

Subscribe

मागील अडीच महिन्यांपासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये शेकडो लोकांनी आपला जीव गमावला असून हजारो कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. इतकंच नव्हे तर दोन महिलांना विवस्त्र करून रस्त्यावर परेड केल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यावर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी देखील या संपूर्ण प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.

प्रियांका चोप्राची पोस्ट चर्चेत

- Advertisement -

बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या संपूर्ण प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. प्रियांकाने लिहिलंय की, “नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लज्जास्पद गुन्हा घडल्यानंतर 77 दिवसांनी… कारवाई करण्याआधी. तर्क? कारण?…काहीच नाही. काहीही होवो पण परिस्थिती आम्हा महिलांना कोणत्याही खेळामध्ये प्यादा बनवण्याची परवानगी देत नाही. ही लाज आणि राग आता फक्त एकाच गोष्टीसाठी आवाज उठवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे – लवकरात लवकर न्याय मिळवण्यासाठी.”

- Advertisement -

तर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने देखील या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. आलियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलंय की, “महिलांना केवळ एक आई, बहीण आणि मुलीच्या रुपातच सन्मान मिळाला आहे. महिला देखील एक मनुष्य आहेत आणि त्यांनाही समानतेचा अधिकार आहे. ही आदर आणि नम्रतेची नाही तर त्यांच्या अधिकाराची बाब आहे.” असं आलियाने लिहिलं आहे.

अक्षय कुमारची पोस्ट चर्चेत

अभिनेता अक्षय कुमारने देखील ट्वीटरवर ट्वीट शेअर करत लिहिलंय की, “मणिपूरमधील महिलांवरील हिंसाचाराचा व्हिडिओ पाहून धक्का बसला. मला आशा आहे की, दोषींना इतकी कठोर शिक्षा होईल की पुन्हा असे कृत्य करण्याचा कोणी विचारही करणार नाही.”


हेही वाचा : Manipur Violence : हे मानवतेला कलंक, महिलांच्या धक्कादायक घटनेवर आशुतोष राणाची पोस्ट चर्चेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -