घरमनोरंजनअश्रूंची झाली फुले....

अश्रूंची झाली फुले….

Subscribe

नाटकाच्या पहिल्या प्रयोगाने नाशिकमध्ये 'हाऊस फुल्ल' ची पाटी घेतली. त्यानंतर सलग तीन प्रयोग नाटकं हाऊसफुल झालं. या नाटकाच्या निमित्ताने आजच्या पिढीला तीन अंकी नाटकं म्हणजे नेमकं काय हे समजलं.

अनामिका,कान्हा मॅजिक निर्मीत ‘अश्रूंची झाली फुले’ हे अजरामर नाटक नव्याने रंगभूमीवर दाखल झालं आहे. काशीनाथ घाणेकरांनी अजारामर केलेली ‘लाल्या’ ही भूमिका त्याकाळी जितकी गाजली असेल तितकीच त्या भुमिकेची उत्सुकता या काळातही प्रेक्षकांना आहे. याच एकमेव कारण म्हणज अभिनेता सुबोध भावे. ‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ या सिनेमातून मोठ्या पडद्यावर डॉ. काशिनाथ घाणेकरांची भूमिका ताकदीनं साकारणारा अभिनेता सुबोध भावेनं आता, घाणेकरांनी गाजवलेल्या ‘लाल्या’च्या भूमिकेत दिसणार म्हटल्यावर साहजिकच प्रेक्षकांमध्ये नाटका विषयीची उत्सुकता वाढली. नाटकाच्या पहिल्या प्रयोगाने नाशिकमध्ये ‘हाऊस फुल्ल’ ची पाटी घेतली. त्यानंतर सलग तीन प्रयोग नाटकं हाऊसफुल झालं. या नाटकाच्या निमित्ताने आजच्या पिढीला तीन अंकी नाटकं म्हणजे नेमकं काय हे समजलं.

अश्रूंची झली फुले

कल्याणच्या अत्रे रंगमंदीरात नाटकाचा तीसरा हाऊसफुल प्रयोग बघण्याचा योग आला. नाटक सुरू झालं. एक एक पात्र अधोरेखीत होतं गेली. या सगळ्यांमध्ये लक्ष लागलं होतं ते लाल्याच्या प्रवेशाची. अखेर लाल्या स्टेजवर आला आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. यावेळी आमच्यासाठी काशीनाथ घाणेकर असणाऱ्या सुबोध भावे यांची जादू अनुभवायला मिळाली. नाटकात प्रोफेसर विद्यानंद यांच्या भुमिकेत शैलेश दातार आहेत. शैलेश दातार अक्षरश: प्रोफेसर जगले आहेत. त्यांचा स्टेजवरचा वावार, पाठांतर यांचा उत्तम अनुभव नाटक बघताना येतो. तीन तासाच्या नाटकात जवळपास दोन तास प्रोफेसर स्टेजवर दिसतात. ‘अश्रूंची झाली फुले’ हे नाटक सर्वप्रथम ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर यांनी त्यांच्या नाट्यसंपदा संस्थेतर्फे १९६६ मध्ये रंगमंचावर आणले होते. स्वत: पणशीकरांनी २००२ पर्यंत या सदाबहार नाटकाचे ११११ प्रयोग सादर करून ते अजरामर केले होते. शैलश दातार यांना या भुमिकेत बघताना कोणतीच उणीव जाणवत नाही. तर सीमा देशमुख यांनी देखील सुमित्रा वैनींची संयमी भुमिका चोख बजावली आहे. नाटकात विद्यानंद यांच्याबरोबर एक पात्र नाटक संपल्यानंतरही लक्षात राहते ते म्हणजे शंभुमहादेव. अभिनेता उमेश जगताप यांनी शंभुमहादेव हे पात्र साकारलं आहे. मालिकेतून सगळ्यांसमोर येणारे झेंडे नाटकाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण करतात.

- Advertisement -
अश्रूंची झली फुले

नाटकाची खरी ताकद आहे ती संवादांमध्ये. ‘उसमे क्या है?’, ‘आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतय…..’ही लाल्याची तोंडची वाक्य आता प्रेक्षकांची तोंड पाठ झाली आहेत. पण प्रोफेसर विद्यानंद यांची वाक्यही विचार करायला भाग पडतात. अनेक ‘अरे ख-याची झलक पाहिली आता खोट्याची मजा बघतोय मजा. पुण्यातील चव गेली आता पाप कशाशी खातात ते शोधतो आहे.’ ही वाक्य हमखास टाळ्या घेऊन जातात.

अश्रूंची झली फुले

नाटकाविषयी लिहीताना आवर्जून एक उल्लेख करायला हवा तो म्हणजे नाटकाचे सर्वोत्कृष्ट नेपथ्य. नाटकाचा तो काळ कमी वेळात स्टेजवर उतरवण्याची किमया नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी केली आहे. एका नाटकात चार भव्य सेट उभारणे हे काम सोपे नाही. विद्यानंद याचं घर, धर्माप्पा याचं घर, जेल, विमानतळ असा चार भव्य सेट एगदी कमी कालावधीत तुमच्यासमोर उभे राहतात. नाटकातील विमानतळा सेट अगदी मस्त जमून आला आहे. नेपथ्याबरोबर नाटकातील कलाकारांच्या वेशभुषेवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. विद्यानंद यांचा स्वभावात झालेला बदल त्यांच्या बदलत्या वेशभुषेमुळे सहज प्रेक्षकांपर्यंत पोहचतो.

सध्या मालिका, मराठी मोठ्या प्रमाणावर येणारे बायपिक,’..आणि काशीनाथ घाणेकर’ या चित्रपटाच्यानंतर सुबोध भावे यांची लोकप्रियता वाढली आहे. त्याचबरोबर ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाच्या जाहीरातीतही सुबोध भावे झळकला. कदाचीत त्याचमुळे काही प्रेक्षकांचा नाटक संपल्यावर हिरमोड झाला. ‘नाटकात लाल्या फार दिसलाच नाही’,’आणखी लाल्याची भुमिका हवी होती’,’चित्रपटातून वाक्यांचा पडलेला प्रभाव नाटकात येत नाही’ अशी चर्चा नाटक संपल्यानंतर ऐकायला मिळाली. खरतर नाटक बघायला येताना हे नाटक एकट्या लाल्याच नाही हे लक्षात घ्यायला हवं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -