घरमनोरंजन'सेफ जर्नीज' : लैंगिकतेवर भाष्य करणारी मराठी वेब सीरिज

‘सेफ जर्नीज’ : लैंगिकतेवर भाष्य करणारी मराठी वेब सीरिज

Subscribe

सेक्स, आकर्षण यांसारख्या विषयांवर भाष्य करणारी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे ही वेब सीरिज मराठी भाषेमध्ये असणार आहे. या वेब सीरिजचे नाव 'सेफ जर्नीज' असं आहे.

सेक्स, आकर्षण या संदर्भातील विविध विषयांवर आजही खुल्याने बोललं जात नाही. आजची तरुण पिढी सोशल मीडियाच्या माध्यमातून या विषयांवर व्यक्त जरी होत असली तरी हवी तशी जनजागृती याबाबत झालेली नाही. पुरोगामी म्हणून ख्याती असणाऱ्या महाराष्ट्रातील काही जातींमध्ये आजही कौमार्य चाचणी केली जाते आणि हे वास्तविक आहे. त्यामुळे पाहिजे तशी आधुनिक आणि पुरोगामी विचारसरणी या देशातील लोकांमध्ये पाहायला मिळत नाही. तरुणांनी याबाबतीत खुल्याने व्यक्त व्हावं आणि गैरसमजू दूर करावं, असा संदेश देणारी एक नवी कोरी मराठी वेब सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेब सीरीजमध्ये सेक्स, लग्नापूर्वी होणारे शारीरिक संबंध यासांरख्या विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या मराठमोळ्या वेब सीरीजचे नाव ‘सेफ जर्नीज’ असं आहे.

वेब सीरिजचा ट्रेलर लाँच

या वेब सीरिजचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच लाँच झाला आहे. या वेब सीरिजमध्ये पर्ण पेठे, सुव्रत जोशी, शिवानी रांगोळे हे कलाकार दिसणार आहेत. ही वेब सीरिज ‘प्रयास हेल्थ ग्रुप’च्या संकल्पनेतून साकारली गेली आहे. याशिवाय या प्रोजेक्टला ‘टेक्नो पीर प्रोजेक्ट’ असं नाव देण्यात येणार आहे.

- Advertisement -

कोणकोणत्या मुद्द्यांवर केले जाणार भाष्य?

या वेबसीरिजच्या प्रत्येक लघुपटामध्ये पॉर्न फिल्म्सच्या आहारी जाणं, हस्तमैथून, सुरक्षित शरीरसंबंध, शारीरीकल संबंधांच्या वेळी घ्यायचे काही निर्णय, निर्णयक्षमता, मानसिक संतुलन, अवेळी गर्भधारणा अशा अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला जाणार आहे. यासोबतच लहान मुलांवर होणारे अत्याचार आणि यासंबंधीच्या अनेक मुद्द्यांचा समावेश या वेब सीरिजमध्ये होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -