घरमनोरंजनMiss U Mister : मृण्मयी-सिध्दार्थची लाँग डिस्टशन्स रिलेशनशीप

Miss U Mister : मृण्मयी-सिध्दार्थची लाँग डिस्टशन्स रिलेशनशीप

Subscribe

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत अनावर सोहळा पार पडला. मिस यू मिस्टर २८ जूनला प्रदर्शित होणार आहे.

‘अग्निहोत्र’ या मालिकेतील सुपरहिट जोडी म्हणजे सई आणि नीलची. ही जोडी तब्बल १० वर्षानंतर एकत्र काम करणार आहेत. ही ग्लॅमरस जोडी ‘मिस यू मिस्टर’ या बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल चित्रपटात मुख्य भुमिकेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत अनावर सोहळा पार पडला. मिस यू मिस्टर २८ जूनला प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचा बोल्ड आणि ब्युटीफुल ट्रेलर

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सिध्दार्थ चांदेकर ‘वरूण’ आणि मृण्मयी देशपांडे ‘कावेरी’ हे दोघे नवविवाहीत जोडप्यांच्या भुमिकेत आहेत. वरूणला लग्नानंतर कामानिमित्त काही दिवस लंडनला जावे लागते. आणि सुरू होतं लाँग डिस्टशन्स रिलेशनशीप. सुरूवातीला जरी छान दिवस गेले असले तरी काही दिवसांनी यामुळे या दोघांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. यातून ते दोघे कसा मार्ग काढणार हे बघणं महत्त्वाच आहे.

- Advertisement -

चित्रपटाविषयी मृण्मयी म्हणाली, “मिस यू मिस्टर’मध्ये मी ‘कावेरी’ नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे, सध्याच्या काळात अनेक नवरा बायको कामानिमित्ताने एकमेकांपासून लांब राहतात आणि सुट्टीच्या दिवशी एकमेकांना भेटतात. या सिनेमातदेखील या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या नात्यांमध्ये होणारे बदल आणि या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात, याबद्दलची ही पूर्ण प्रेमकथा आहे. जी या चित्रपटाच्या नावातूनच लक्षात येते.”

तर सिध्दार्थ म्हणतो,“मृण्मयीबरोबर काम करताना खूप मजा आली. या चित्रपटामध्ये मी ‘वरूण’ नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे. समीर जोशी यांनी खूप चांगलं दिग्दर्शन केले असून त्यांनी आम्हाला काम करण्याचे पूर्ण स्वतंत्र दिले होते. त्यामुळे हा चित्रपट खूप दर्जेदार झाला आहे आणि तो नक्की प्रेक्षकांना आवडेल अशी माझी खात्री आहे.”
या चित्रपटात इतरही अनेक आघाडीचे मराठी कलाकार दिसणार आहेत. त्यांत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर आदींचा समावेश आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची रसिकांमधील उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -