घरमनोरंजनMiss Universe 2021 : 'मिस युनिव्हर्स' हरनाज संधूचे मायदेशी जंग्गी स्वागत

Miss Universe 2021 : ‘मिस युनिव्हर्स’ हरनाज संधूचे मायदेशी जंग्गी स्वागत

Subscribe

‘मिस युनिव्हर्स २०२१’ चा किताब जिंकणारी हरनाज कौर सिंधू आज मायदेशी परतली आहे. मिस युनिव्हर्सचा ताज घेत हरनाज मुंबई विमानतळावर दाखल झाली. यावेळी तिचे देशवासियांनी अगदी जंग्गी स्वागत केले. हरनाजचे मुंबई विमानतळावर आगमन होताच उपस्थितींनी एकच जयघोष केला. अनेकांनी तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती. सध्या हरनाजचा मायदेशी परतल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावर ‘मिस युनिव्हर्स २०२१’ ताज घेऊन मायदेशी परतल्याचा आनंद स्पष्ट दिसतोय.

- Advertisement -

जग प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धा ‘मिस युनिव्हर्स २०२१’ चा किताब यंदा भारताच्या हरनाज संधूने आपल्या नावे केला आहे. विशेष म्हणजे २१ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर भारताला हे विजेतेपद मिळाले आहे. यंदा इस्त्राइलमध्ये ही ७० वी सौंदर्यस्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताच्या हरनाज संधूने पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या सौंदर्यवतींना मागे टाकत ‘मिस युनिव्हर्स २०२१’ चा मुकूट भारतात आणला. यापूर्वी अभिनेत्री लारा दत्त आणि सुष्मिता सेन यांनी भारतासाठी ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला होता. तर हरनाज आत्ता ‘मिस युनिव्हर्स’ची तिसरी भारतीय सौंदर्यवती ठरली आहे.

हरनाजने २०१७ मध्ये टाईम्स फ्रेश फेस बॅकमधून तिच्या सौंदर्य स्पर्धांच्या प्रवासाला सुरुवात केली. २१ वर्षीय दिवा सध्या पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेतेय. तिने फेमिना मिस इंडिया पंजाब २०१९ सह अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकला आहेत. यासोबत अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -