घरअर्थजगतPM Kisan 10th Installment : पीएम किसान योजनेचा १० वा हप्ता शेतकऱ्यांच्या...

PM Kisan 10th Installment : पीएम किसान योजनेचा १० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा ? जाणून घ्या

Subscribe

प्रधानमंत्री किसान योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीची शेतकरी आतुरनेते वाट पाहत असतात. यात पीएम किसान सन्मान निधीच्या १० व्या हप्ताची देखील शेतकरी वाट पाहत आहेत. मात्र १५ डिसेंबरला मिळणाऱ्या हप्त्याची रक्कम एक दिवस उशीराने मिळणार आहे. पंतप्रधान आज गुरुवारी १६ डिसेंबर रोजी १० वा हप्ता जारी करू शकतात.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ डिसेंबर रोजी गुजरात सरकारद्वारे आयोजित नैसर्गिक शेती पद्धतीच्या कार्यक्रमाच्या समारोप समारंभाला ऑनलाईन संबोधित करतील. या कार्यक्रमात सुमारे ५,००० शेतकरी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. यामुळे गुरुवारीच पीएम किसानच्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सरकारकडून याची कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

गेल्या वर्षी २५ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले होते. त्यादिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत १८ हजार कोटी रुपये जारी केले.

या पीएम किसान योजनेचा पहिल्या हप्ता म्हणून १८ हजार कोटी रुपये देशातील नऊ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. यानंतर ३१ मार्च २०२१ पर्यंत, या हप्त्यांतर्गत १०,२३,४९,४४३ लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत.

- Advertisement -

असे पहा हप्त्याचे स्टेटस्

या हप्त्याची रक्कम ऑनलाईन चेक केल्यास शेतकऱ्यांना ‘Rft Signed by State For 10th Installment’ असे लिहून आलेले दिसेल. याचा अर्थ राज्य सरकारला लाभार्थींचा डेटा जसे की आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, आणि बँकेचा IFSC कोड बरोबर असल्याचे आढळले आहे. यानंतर आता FTO (Fund Transfer order) जरनेट होईल. यावर स्टेट्समध्ये तुम्हाला ‘FTO is Generated and Payment confirmation is pending’ असे लिहून आल्याचे दिसल्यास लवकरंच तुमच्या अकाउंटमध्ये हप्त्याचे पैसे जमा केले जातील. जोपर्यंत FTO जनरेट होत नाही तोपर्यंत हप्ताची रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जमा होऊ शकत नाही.

अनेकदा आधार कार्ड क्रमांक आणि बँक खात्यातील चुकांमुळे पैसे जमा होऊ शकत नाहीत. याशिवाय आधार कार्डवरील टाकलेले नाव आणि बँकच्या डिटेल्समधील माहिती मिळती जुळती नसल्यास रक्कम जमा होण्यास अडचणी येतात.

हप्त्याची स्थिती कशी तपासायची?

१) पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.

२) अधिकृत वेबसाइटवरील ‘Farmers Corner’ या पर्यायावर क्लिक करा.

३)  यानंतर ‘Beneficiaries List’ या पर्यायावर क्लिक करा.

४)  तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.

५)  ‘Get Report’ वर क्लिक करा.

६)  तुमच्या समोर एक लिस्ट उघडेल, त्या यादीत तुमच्या खात्याचे स्टेटस कळेल.


Bigg Boss 15 : अभिजीत बिचकुलेने टास्कदरम्यान देवोलिनाकडे मागितली Kiss, अभिनेत्रीने केला हंगामा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -