घरमनोरंजनPrajakta Mali : भल्या पहाटे पुणे ते मुंबई एसटीने प्रवास अन्..., प्राजक्ता...

Prajakta Mali : भल्या पहाटे पुणे ते मुंबई एसटीने प्रवास अन्…, प्राजक्ता माळीचा संघर्षमय प्रवास

Subscribe

प्राजक्ता माळी ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. प्राजक्ता तिच्या कामाबरोबर तिच्या व्यवसायामुळेही बऱ्याचदा चर्चेत असते. प्राजक्ता तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोकळेपणाने बोलत असते. प्राजक्ताने आजवर अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. इतकंच नव्हे तर तिने स्वत:चा एक काव्यसंग्रह देखील प्रसिद्ध केला आहे.

कोणत्याही क्षेत्रात काम करायचे असेल तर सुरुवातीचा काळ हा अत्यंत खडतर असतो. चांगले काम शोधण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावीच लागते. अनेक छोट्या- मोठ्या कलाकारांच्या बाबतीतही असंच होतं अभिनय, कला क्षेत्रात काम करण्यासाठी जेव्हा नवे कलाकार पुढे येतात तेव्हा त्यांनाही असाच अनुभव येतो. अभिनेत्री प्राजक्ता माळी हीचे सुरुवातीचे दिवस, स्ट्रगलचा काळ खडतर होता. प्राजक्ता पुण्यात राहत होती. त्यामुळे सुरूवातीच्या काळात शुटिंगसाठी तिला पुणे ते मुंबई असा प्रवास करावा लागायचा. याबाबत एका मुलाखतीदरम्यान प्राजक्ता माळीने भाष्य केलं आहे.

- Advertisement -

प्राजक्ता माळीचा स्ट्रगलचा काळ
सुरुवातीला प्राजक्ता एसटीने प्रवास करायची. FY ला असताना प्राजक्ता “गुड मॉर्निंग महाराष्ट्र” हा कार्यक्रम होस्ट करत होती. प्राजक्ताला तिच्या आईसोबत पुणे ते मुंबई असा प्रवास करावा लागयचा. भल्या पहाटे प्राजक्ता एसटीने प्रवास करायची. मुंबईत ही बस तिला सायनला सोडायची. मग तिथून रिक्षाने प्राजक्ता तिच्या सेटवर जायची. तिथे दिवसभर शूट करायची. त्यानंतर रात्री 10 वाजता चेंबूरला जायची. तिथून आईसोबत एसटीतून पुण्याला जायची. पुण्याला पहाटे तीन, चारला पोहचायची. तिथून टू व्हीलरवर घरी जायची. तेव्हा 25- 26 तासांचा दिवस असायचा. जवळपास अडीच वर्षे असा प्रवास करून तो शो होस्ट केला, असं प्राजक्ताने एका मुलाखतीत सांगितलं.

एकदा मी हट्ट केला की टॅक्सीने ऑडिशनला जाणार. आईने तो पूर्ण केला पण पुढे दीड वर्ष तिने मला एसटीनेच मुंबईला नेलं. पुढे एसी बसने प्रवास केला. तेव्हा वाटायचं की वॉव मी एसी बसने प्रवास करतेय. खूपच भारी वगैरे वाटायचं. असंही तिने सांगितलं.
जेव्हा मी “सुवासिनी” मालिका करायला लागले. तेव्हा मी आणि पप्पांनी निम्मे- निम्मे पैसे टाकून पहिली ऑल्टो कार घेतली. कारण तेव्हा सेट खूप आत होता. तिथून रिक्षा मिळायची नाही. त्यामुळे ही कार घेतली. तेव्हा मग मी मुंबईत राहात होते. तर त्या कारने प्रवास करू लागले, असं प्राजक्ता माळीने सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -