घरमनोरंजनआमटे कुटुंबाशी दिलखुलास गप्पा

आमटे कुटुंबाशी दिलखुलास गप्पा

Subscribe

कलर्स मराठी वाहिनीवर ‘नवरा असावा तर असा’ हा गप्पांचा कार्यक्रम प्रत्येक रविवारी रात्री ९ वाजता प्रसारित होतो. माणूस जन्माला आला की त्याच्या जीवनात समाजनियमाप्रमाणे ज्या दोन-चार गोष्टी घडतात, त्यात विवाहबंधन ही एक गोष्ट आहे. त्यामुळे लग्न करणे कोणाला चुकलेले नाही. काही वर्षांपूर्वी संस्काराचा, परंपरेचा एक भाग म्हणून लग्न टिकवले जात होते. पण आता पती-पत्नी दोघेही सुजाण, होतकरू असल्यामुळे स्वाभिमान हा दोघांच्याही जीवनाचा एक भाग झालेला आहे. जे समजून घेतात, ते टिकतात. पण त्याहीपलीकडे तडजोड करुन समाजाच्या हितासाठी धनाचा फारसा विचार न करता तनाने आणि मनाने एकत्र येतात ते खरं लग्न. अशा त्यागाला महत्त्व देणार्‍या जोडप्यांना ‘नवरा असावा तर असा’ अशा कार्यक्रमात निमंत्रित केले जाते.

या कार्यक्रमाने पंचाहत्तर भाग पूर्ण केलेले आहेत, तेव्हा त्याचा आनंद व्यक्त करणे हे आलेच. कलर्स मराठीच्या टीमने या भागासाठी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांना निमंत्रित केलेले आहे. या दोघांचे नाव ऐकल्यानंतर आपल्या चेहर्‍यावर प्रसन्नता येणे सहाजिकच आहे. कारण, या दोघांचा विवाह एकत्र येण्यासाठी झाला; पण काम करायचे तर समाजासाठी हा एकच ध्यास त्यांनी घेतला. जिथे कोणतीही सुविधा नाही अशा हेमलकसा भागात जाऊन आदिवासींच्या सोबत राहून त्यांनी वैद्यकीय सेवा केलेली आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहे. परंतु पती-पत्नीच्या नात्यात इतरही अनेक गोष्टी आहेत, त्या त्यांच्या गप्पांतून उलगडल्या जाणार आहेत. महत्त्वाकांक्षा, त्याग, संसाराची ओढ या सार्‍या गोष्टी या मुलाखतीतून ऐकायला मिळतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -