घरमनोरंजनकंगनाच्या ‘इमरर्जन्सी’ चित्रपटाचा नवा टीझर रिलीज

कंगनाच्या ‘इमरर्जन्सी’ चित्रपटाचा नवा टीझर रिलीज

Subscribe

बॉलिवूडची धाकड गर्ल अशी ओळख असलेली अभिनेत्री कंगना रनौत वारंवार तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. येत्या काळात कंगनाचा ‘इमरर्जन्सी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये कंगनाने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. अशातच, आता पुन्हा एकदा या चित्रपटाचा दुसरा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

कंगनाच्या ‘इमरर्जन्सी’चित्रपटाचा नवा टीझर

- Advertisement -

या टीझरची सुरुवात 25 जून 1975 या दिवसापासून होते. सगळीकडे दंगलीचे वातावरण दिसत आहे. अनेकजण पोलिसांवर दगडफेक करत आहेत. पोलिस देखील त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. या घटनेची माहिती वर्तमानपत्रात आलेली दिसते. ज्यावर ‘भारतात आणीबाणी लागू करण्यात आली’ असं लिहिलं आहे. सध्या हा टीझर पाहून प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

या दिवशी होणार चित्रपट रिलीज

कंगनाचा ‘इमरर्जन्सी’चित्रपट येत्या 24 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना मुख्य भूमिका साकारणार असून अनुपम खेर, मिलिंद सोमन, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.

- Advertisement -

 


हेही वाचा :

दीपिका-रणवीरच्या नव्या घराचा व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -