घरमनोरंजन'जय श्रीराम'च्या घोषणेवरून नुसरत भडकल्या; म्हणाली 'गळाभेट घेत रामाचं नाव घ्या, पण...

‘जय श्रीराम’च्या घोषणेवरून नुसरत भडकल्या; म्हणाली ‘गळाभेट घेत रामाचं नाव घ्या, पण…

Subscribe

सरकारी कार्यक्रमात राजकीय आणि धार्मिक घोषणांवर नुसरत यांची टीका

पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका कार्यक्रमात जयश्री राम अशा घोषणा दिल्या. यावर टीमएमसीचे खासदार नुसरत जहां भडकल्याचे पाहायला मिळाले. हाच आपला राग त्यांनी ट्विटरवरुन व्यक्त केला. यावेळी त्यांनी घोषणाबाजी व विरोधी पक्षांवरही जोरदार टीका केली. सरकारी कार्यक्रमात राजकीय आणि धार्मिक घोषणांवर त्यांनी टीका केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवी स्मृतीदिनानिमित्त हा सरकारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, या कार्यक्रमात ‘जयश्री राम’ अशा घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाल्याचे बघायला मिळाले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित एका सरकारी कार्यक्रमात ‘जय श्री राम’ च्या घोषणा देण्यात आल्या आणि त्यानंतर हा मुद्दा बंगालच्या राजकारणामध्ये चर्चेत आला आहे. यासंदर्भातच नुसरत जहां यांनी एक ट्विट केले त्यात असे लिहिले आहे की, ‘गळाभेट घेत रामाचं नाव घ्या, गळा घोटून नाही ‘स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त आयोजित सरकारी कार्यक्रमात राजकीय आणि धार्मिक घोषणांच्या मी तीव्र टीका करते, असेही त्यांनी सांगितले.

असं आहे नुसरत जहां यांचं ट्वीट

- Advertisement -

कोलकात्यातील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होते. ममता बॅनर्जी भाषण देण्यासाठी गेल्या असता कार्यक्रमातील काही लोकांनी जय श्री राम आणि भारत माता यांचा जयघोष सुरू केला. यावेळी ममता बॅनर्जी चिडल्या आणि भाषण करण्यास नकार दिला. दरम्यान, लोक शांत झाल्यावर त्यांनी थोडे भाषण केले. ते म्हणाले की, शासनाच्या कार्यक्रमाच्या प्रतिष्ठेची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. शासकीय कार्यक्रमात थोडे मोठेपण असले पाहिजे आणि तुम्ही ज्याला आमंत्रित केले आहे त्याचा अपमान करणे योग्य नाही. ममता बॅनर्जी यांनी आपल्या संक्षिप्त भाष्यात सांगितले की हा राजकीय कार्यक्रम नव्हे तर सरकारी कार्यक्रम आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -