घरमुंबईविज्ञानकथा ही केवळ भयकथा असू नये - डॉ जयंत नारळीकर

विज्ञानकथा ही केवळ भयकथा असू नये – डॉ जयंत नारळीकर

Subscribe

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आणि ललित अंगाने विज्ञानविषयक लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयंत नारळीकर यांची यंदा ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड झाली आहे. (94th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) विज्ञानकथेच महत्व, जनसामान्यांपर्यंत वैज्ञानिक दृष्टीकोन पोहचवण्यासाठी विज्ञानकथेचा उपयोग आणि विज्ञानकथा ही केवळ भयकथा का असू नये याबाबतचा दृष्टीकोन डॉ नारळीकर यांनी आपल्या यक्षाची देणगी या पहिल्याच कथासंग्रहातून मांडला आहे.

वैज्ञानिक शोध आणि त्यांचे तंत्रज्ञानात झालेले रूपांतर मानवसमाजास कोणीकडे खेचत आहे, ह्याची जाणीव सामान्य माणसात निर्माण करण्याची जबाबदारी मूलतः वैज्ञानिकांवर आहे. वैज्ञानिक दृष्टीकोण संशोधनाच्या मुळाशी असला, तरी तो जीवनात इतरत्रही लागू पडत असल्यामुळे तो जनसामान्यांपर्यंत पोचविणे हे वैज्ञानिकाचे काम आहे. ह्यासाठी विज्ञानकथेचा बराच उपयोग होऊ शकतो, असे मत मराठीत विज्ञानकथा, कांदबरी लेखनास प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे विज्ञानकथाकार डॉ जयंत नारळीकर यांचे मत आहे. तसेच विज्ञानकथा ही केवळ भयकथा असू नये, भयकथेत मांडलेले विज्ञानाचे अधोरी स्वरूप वैज्ञानिक दृष्टीकोण जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याच्या उदिष्टाला बाधक ठरते, असेही डॉ. नारळीकर यांना वाटते. यक्षाची देणगी (१९८४) ह्या त्यांच्या पहिल्या कथासंग्रहाच्या प्रास्ताविकात त्यांनी ही भूमिका मांडली आहे.

- Advertisement -

माध्यमिक शिक्षणात विज्ञानाला मिळालेले महत्व विज्ञानकथांसाठी अनुकूल परिस्थितीचे एक कारण होते. दूरचित्रवाणिसारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा आणि त्यावरील विज्ञानकथामक कार्यक्रमांचाही यासाठी फायदा झाला. मराठी विज्ञान परिषदेने दर वर्षी विज्ञानकथा लेखनाची स्पर्धा सुरू केली हेदेखील एक महत्वाचे कारण होते. डॉ. जयंत नारळीकरांसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलीय भौतिकविज्ञ विज्ञानकथा लिहू लागल्याने ह्या लेखन प्रकाराला मराठी एक वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त झाली.

विज्ञान हे ज्याच्या आशयाचे अविभाज्य आधिष्ठान आहे, अशा साहित्यकृतींचा समावेश ‘सायन्स फिक्शन’ (लघुरूप-एस्एफ्) ह्या इंग्रजी संज्ञेने निर्दिष्ट केल्या जाणाऱ्या साहित्यात होतो. ‘सायन्स फिक्शन’ या संज्ञेचा मराठी पर्याय म्हणून ‘विज्ञानकथा’ ही संज्ञा रूढ झालेली आहे. या संज्ञेत ‘कथा’ हा शब्द असला, तरी ही संज्ञा केवळ ‘कथा’ ह्या साहित्यप्रकारापुरती मर्यादित नसून तिच्या कक्षेत कथेप्रमाणेच कादंबरी, नाटक इ. अन्य ललित साहित्यप्रकारांतील कृतीही अंतर्भूत आहेत. मात्र ‘विज्ञानकथा’ म्हणून झालेले लेखन पाहिले, तर त्यात मुख्यत्वे कथा कादंबऱ्याच आढळतात असा संदर्भ मराठी विश्वकोशात आढळतो.

- Advertisement -

विज्ञान कथा ही ललित साहित्यकृतीच असते. त्यामुळेच तिला विज्ञानाचे अधिष्ठान असलेच पाहिजे हे मान्य केल्यानंतर तिचे मूल्यमापन करताना कथा – कादंबरी – नाटक यासारख्या साहित्यकृतींच्या मूल्यमापनासाठी समीक्षेचे जे निकष वापरले जातात, तेच इथेही लावले पाहिजेत. असेही होऊ शकेल की विज्ञानाचे आवश्यक अधिष्ठान दुबळे अपुरे असल्यामुळे एखादी साहित्यकृती विज्ञानकथा म्हणून दर्जेदार ठणार नाही, पण एक साहित्यकृती म्हणून श्रेष्ठ ठरेल. ह्याच्या उलटही घडू शकेल. एखाद्या साहित्यकृतीतीतल विज्ञानाचा घटक अस्सल असूनही एख साहित्यकृती म्हणून ती कनिष्ठ दर्जाची असू शकेल.

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -