घरताज्या घडामोडी'वन फोर थ्री' चा थिएटरमध्ये कल्ला, दोन दिवस चित्रपट हाऊसफुल्ल

‘वन फोर थ्री’ चा थिएटरमध्ये कल्ला, दोन दिवस चित्रपट हाऊसफुल्ल

Subscribe

प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणारा  ‘वन फोर थ्री’ हा रोमँटिक आणि खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित चित्रपट 4 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.   दाक्षिणात्य चित्रपटांची धाटणी असलेला हा मराठीतील पहिला वहिला चित्रपट पाहण्यास प्रेक्षक उत्सुक असून भरभरून प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत.

दोन दिवसातच चित्रपटाने सिनेमागृहात चांगलीच बाजी मारली असून, मराठवाडा, औरंगाबाद, नांदेड, परभणी, नागपूर, नाशिक या भागात चित्रपट हाऊसफुल्ल झाला आहे. तर पुण्यातील काही भागात चित्रपटाने हाऊसफुल्ल होत चांगलाच गल्ला केला आहे. प्रेक्षकही चित्रपटाचे भरभरून कौतुक करताना पाहायला मिळत आहेत.

- Advertisement -

दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित या प्रेमाचे विविध रंग उधळणाऱ्या चित्रपटात अभिनेता योगेश भोसले आणि शीतल अहिरराव यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. तर अभिनेता वृषभ शहाचा खलनायकाची भूमिका साकारली आहे.  याशिवाय या चित्रपटात सुरेश विश्वकर्मा आणि शशांक शेंडे यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत.

या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी संगीतबध्द केले आहे. तर लखन चौधरी यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. आपल्या सर्वांची लाडकी अशी सुमधुर गायिका आर्या आंबेकर हिने भरली मना मध्ये हे चित्रपटातील गाणे सुमधूर आवाजात रेकॅार्ड केले आले. तर चित्रपटातील ‘वाचू दे इष्काचा प्राण’ ही कव्वाली प्रमोद त्रिपाठी यांनी गायली असून आयटम सॉंग ‘पडला खटका’ रेश्मा सोनावणे हिने शब्दबद्ध केले आहे. तर सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी त्यांच्या दमदार आवाजात ‘धिंगाणा’ पार्टी सॉंग गायले आहे.

- Advertisement -

‘वन फोर थ्री’ चित्रपटाची कथा रिअल लाईफ स्टोरीवर आधारित असून यांत एकमेकांवर जीव जडलेल्या प्रेयसी आणि प्रियकराची कथा पाहायला मिळणार आहे. लवकरात लवकर सिनेमागृह गाठून प्रेमाची परिभाषा सांगणारा हा चित्रपट आवर्जून पाहा.


हेही वाचा – महिला कला महोत्सवात ‘सर, प्रेमाचं काय करायचं’ हाऊसफुल्ल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -